
*मिलेनियम पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा *
नांदेड : श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ,होटाळा अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यालयांच्या वतीने १५ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगावच्या प्रांगणात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे . त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करणार नाही आणि परीक्षेत कोणत्याही प्रकारे नक्कल करणार नाही,अशी शपथ संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या शपथविधीतून विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प केला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यमुनाबाई माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच श्री दत्त प्राथमिक,माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे,देशभक्तीपर गीते,पथसंचलन,तसेच LKG व UKG मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डान्स सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर घोषवाक्ये आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
“स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! भारत माता की जय! वंदे मातरम्!” अशा देशभक्तीपर घोषणांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय प्रमुख प्राचार्य के.व्ही.फाजगे सर,दत्त ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर.एम.सूर्यवंशी सर,दत्त माध्यमिकचे मुख्याध्यापक ई.एस.कल्याण सर,मिलेनियम पब्लिक स्कूलचे प्राचार्य एस.एस.वडजे सर,उपप्राचार्य डी. व्ही. जोशी सर,यमुनाबाई प्राथमिकच्या मुख्याध्यापिका एस.बी.पांडे मॅडम,दत्त प्राथमिकचे मुख्याध्यापक आर.बी.पवार सर,आनंद पवार सर यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सोनमंकर सर यांनी केले.






