HomeBlogसमाजात जनजागृत्ती करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे : बी.एल.माने

समाजात जनजागृत्ती करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे : बी.एल.माने

समाजात जनजागृत्ती करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे : बी.एल.मानेसातारा :

सातारा जिल्हा प्रतिनिधी /अनिल वीर

पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वंकष अशी माझी अनिल वीर देत असतात. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने यांनी केले. सम्यक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा अभिष्टचिंतन सोहळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला.तेव्हा मुख्य संघटक बी.एल.माने मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे मुख्य सल्लागार शामराव बनसोडे होते. बी.एल.माने म्हणाले,”अनिल वीर यांनी आपल्या कुटुंबासह जन्मभूमी व कर्मभूमीत भरीव असे काम केलेले आहे.ते विविध क्षेत्रात अलौकिक असे कार्य करीत असल्याने वयाची ५६ केली असली तरी त्यांना पुरस्कार अधिकचे मिळालेले आहेत.यापूर्वी,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोरोना काळात महायोद्धा व गतवर्षी मानपत्र देऊन वीर सरांचा गौरव केलेला आहे.गणेश कारंडे यांच्याही पुढाकाराने त्यांना सर्वहारा ही पदवी देऊन सन्मान करण्यात आला होता.”

प्रशांत झालटे म्हणाले,”आपल्या चळवळीत ४-५ अशी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामध्ये वीर सरांचेही अभ्यासपूर्ण अशी वाटचाल आढळून येत आहे. बहुजन संघटनांच्या पाठीशी ते उभे असतात.चांगल्या विचाराने एकमेकास न दुख:वता धम्म विचाराने एकत्रीत येणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहतात.त्यांचे संबंध सर्व घटकांशी आपुकीचे आहेत.”

 यावेळी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि.रमेश इंजे, डॉ.बाबासाहेब स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदींनी मनोगत व्यक्त केली. विश्वरत्न कल मंचचे बंधुत्व शाहिररत्न किरण जगताप यांनी अनिल वीर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे गाणं सादर केले.त्यांना साथ अध्यक्ष संतोष मोरे,दिलीप कांबळे आदींनी दिली.    सदरच्या कार्यक्रमास जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे हिशेब तपासनीस नंदकुमार काळे, विजय गायकवाड,शाहीर श्रीरंग रणदिवे, ज्येष्ठ नेते वामन म्हस्के, प्राचार्य प्रकाश रणबागले, धम्मबांधव उत्सव कमिटीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर त्यांचे सहकारी व कन्या,उत्तम डी.पोळ (कराड) व उत्तमराव पोळ (सातारा), कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मारुती भोसले, सचिव चंद्रकांत म्हस्के, प्रविणकुमार चांदणे, घमरेसाहेब,मधुकर आठवले, बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार विजेते नाना पवार, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश कारंडे व कोषाध्यक्ष प्राचार्य रमेश जाधव,पदाधिकारी व सदस्य,डॉ.आदिनाथ माळगे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग कात्रे, अंकुश धाइंजे,दिलीप सावंत,माजी शिक्षणाधिकारी  डी.एस. भोसले,अशोक कांबळे,प्रसाद येवले, शहाजी वाघमारे,विश्वास सावंत आदी विविध संघटनांचे पदाधिकारी,प्रतिनिधी,कार्यकर्ते, उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनिल वीर यांनी आभार मानले.       

प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तथागत फाऊंडेशनचे सुशीलकुमार कांबळे, चंद्रकांत खंडाईत व अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर थेरो दिंपकर (भन्ते) यांच्या अधिपत्याखाली विधी घेण्यात आला.केक कापून सर्वांनी एकमेकांचे तोंड गोड केले.सरते शेवटी तर ऋतू हॉटेलमध्ये चहापानाने सांगता करण्यात आली.फोटो : अनिल वीर यांचा जाहीर सत्कार करताना बी.एल.माने व शामराव बनसोडे शेजारी मान्यवर.

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

RELATED ARTICLES

Most Popular