HomeBlogहुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीचे काम दर्जाहीन…नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीचे काम दर्जाहीन…नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

नाली व रस्ते बांधकामासाठी कोठ्यावधीचा निधी काम मात्र निकृष्ट व बोगस…..

हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीचे काम दर्जाहीन…

नाली व रस्ते बांधकामासाठी कोट्यावधीचा निधी काम मात्र बोगस …..

नांदेड / प्रतिनिधी अशोक वाघमारे.

    नायगाव तालुक्यातील हुस्सा येथे पुनर्वसन विकास प्रकल्प निधीतून मोठ्या प्रमाणात कामे चालू असून गावातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र गुत्तेदार यांनी जाणीवपूर्वक कामामध्ये शासनाने दिलेल्या अंदाजपत्रका नुसार काम करण्याऐवजी कामात अनियमतता व बोगस काम केल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हुस्सा येथे नाली व रस्ते बांधकाम अंकुश पवार यांचे कंट्रक्शन मार्फत होत असून यासाठी सुमारे कोट्यावधी रुपयांचा निधी ठेवण्यात आला मात्र संबंधित गुत्तेदाराकडून कामात मोठ्या प्रमाणात अपराथापर करून बोगस काम केल्याचे गावकऱ्याच्या निर्देशनास येतात गावातील नागरिकांत असंतोष पाहायला मिळाला आहे. सदर कामात संबंधित प्रशासनाचे व गुत्तेदार यांच्यात आर्थिक मिलीभगत असल्याचे देखील बोलले जात आहे. हुस्सा येथील चालू असलेल्या बोगस कामावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने गुत्तेदार व संबंधित प्रशासन यांना नेमकं कोणाचा राजाश्रेय व कोणाच्या आशीर्वादाने एवढ्या दिवसा ढवळ्या बोगस काम होतात अशा प्रश्नांना मात्र गावातून वाचा फुटत आहे.

हुस्सा येथील विकास कामाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा बट्ट्याबोळ प्रशासन मात्र सुस्त शासनाच्या निधीवर संबंधित गुत्तेदाराने अक्षरशः दरोडा टाकल्यास सारखे बोलले जात आहे. गावातील मेन रस्त्यावरील नाली बांधकामाचे अक्षरशः स्लॅप कोसळले आहे.  बांधकामाच्या वेळी पाण्याचा कमी पुरवठा व निकृष्ट दर्जाचे मटरेल वापरल्याचा परिणाम व चातुर्मातुर काम करण्यात अंकुश पवार यांचे कंट्रक्शन अग्रेसर असल्याचे परिसरात जोरदार चर्चा. अशा बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कंट्रक्शनला कामच कसे मिळतात व कोणाच्या आशीर्वादाने मिळतात अशा उलट सुलट चर्चांना उधाण येत आहे.
 हुस्सा येथे पुनर्वसन विकास प्रकल्प निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोठ्या प्रमाणात कामे झाले आहे. व काही प्रमाणात शिल्लक काम राहिल्याने गावकऱ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नालीचे  पाणी जाण्यासाठी मार्ग देखील काढण्यात आलेला नाही. परिणामी नालीचे पाणी काही iनागरिकांच्या घरात घुसल्याचे दिसून येत आहे.तर काही ठिकाणी अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी  करण्यासाठी नागरिकांची कसरत होत आहे.गावामध्ये निकृष्ट व बोगस कामे झाल्याने संतप्त  गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व संबंधित गुत्तेदार आणि प्रशासन  यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular