HomeBlogहुस्सा येथे गेल्या एक महिन्यापासून वानरांचा कहर.....

हुस्सा येथे गेल्या एक महिन्यापासून वानरांचा कहर…..

नायगाव प्रतिनिधि. अशोक वाघमारे

हुस्सा येथे गेल्या एक महिन्यापासून वानरांचा कहर…..

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

तालुक्यातील मौजे हुस्सा येथे मागील गेल्या एक महिन्यापासून वानरांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातल्याने गावातील कच्चे बांधकाम असलेल्या घरांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही घरावरील पत्रा तुटून पडल्याचे देखील आढळून आले आहे.

वानर हे गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे दोस्त घालत असल्याने महिला व बालकांत भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. मागील एक महिन्यापासून धुमाकूळ घालत असलेल्या वाणरांनी गावामध्ये मोठे थैमान घातले असून यामुळे नागरिकांच्या घरांची अतोनातून नुकसान होत आहे. हुस्सा व परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असल्याने वानरांचा आसरा या भागामध्ये संपुष्टात आल्याने वनराणी गावात हैदोस घालत आहे. भुसा व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड राहेर येथे वीट भट्टी साठी वृक्षतोड केलेले मोठ्या प्रमाणात लाकूड जात आहे. याकडे संबंधित प्रशासन मात्र झोपेच्या सोंगात असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनाच्या बेरोजबाबदारपणामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वक्ष तोड यामुळे वानरांना व माकडांना राहण्यासाठी आसरा मिळत नसल्याने गावामध्ये येऊन आसरा शोधण्याच्या धुंदीत गावामध्ये येऊन हैदोस घालत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

म्हणून जंगली प्राण्यावर त्वरित उपाय करून त्यांना जेरबंद करावे अशा प्रकारची मागणी गाव खेड्यातून जोर धरताना दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular