वाढदिवस ठरला हरित सोहळा!
नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम लालवंडीत राबवण्यात आला.
कु. धनश्री नागेश येरसनवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा, लालवंडी येथे तब्बल १०० फळझाडे आणि शोभेच्या झाडांची लागवड करून हरित वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमात कॅनिप्रास, बॉटल चाँत, मोरपंखी, तार, पारिजातक, फायकॅराट, तोडा, तोफखाना, जाहोपा, दुराई, महागणी अशा विविध प्रकारच्या फळझाडांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान पा. लंगडापुरे (उपसरपंच) होते.
यावेळी जोंधळे प्रकाश (सरपंच प्रतिनिधी), शिवराम अप्पा यरसनवार (माजी सरपंच व मुलीचे आजोबा), नागेश शिवराम यरसनवार (ग्रामपंचायत अधिकारी व मुलीचे वडील), रंजित पा. कुरे (सरपंच ताकबिड), नागेश पा. कल्याण ( पत्रकार), रामराव बामनपल्ले, व्यंकटराव इंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वृक्षारोपण उपक्रमात युवराज लालवंडे (माजी सरपंच), संगेपवाड नागेश, शिवराज वरवटे, प्रताप बोमनाळे, माधव परगेवार, अँड. नीलकंठ पा. कुरे, शिवराज इंद्रे, बालाजी यरसनवार, स्वप्नील यरसनवार, भागवत निरदुडे, अरविंद इंद्रे, शिवानंद बामनपल्ले (STI), सुनिल होनराव, गजानन इंद्रे, प्रदिप आलेवार, बाबुराव निरदुडे, योगेश यरसनवार, श्याम बामनपल्ले, सुनपे शहाजी (सहशिक्षक), देविदास बैस (मुख्याध्यापक) यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
महिला वर्गातही मोठ्या उत्साहाने सहभाग घेण्यात आला.
राणी नागेश यरसनवार (मुलीची आई), उर्मिला यरसनवार, अल्काताई यरसनवार, सुनंदा यरसनवार, रंजना इंद्रे, सोनाली बरबडेकर, रुपाली पडकंठवार, संतोषीमाला यरसनवार, ज्योतीताई इंद्रे, ललिता चेडगुलवार, पंचफुला यरसनवार, गंगामनी वेंकटराव यरसनवार, स्नेहा परगेवार यांनी देखील वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला.
चौकट
“हरित ग्राम सुंदर ग्राम” संकल्पनेला बळ
लालवंडी शाळेत नव्याने रुजू झालेले शहाजी सुन्पे सर यांनी आपली पूर्वीची शाळा गोधामगाव येथील उपक्रमा प्रमाणे येथे ही मुख्याध्यापक कवटीकवार सर यांच्या मार्गदर्शना खाली राबवलेल्या या उपक्रमातून ‘हरित ग्राम – सुंदर ग्राम’ या संकल्पनेला बळ मिळाले असून, ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला आहे.







