HomeBlogनरसी येथे प्रशांत मोटार ड्रायविंग स्कूलचा शुभारंभ..

नरसी येथे प्रशांत मोटार ड्रायविंग स्कूलचा शुभारंभ..

नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे

नरसी येथे प्रशांत मोटार ड्रायविंग स्कूलचा शुभारंभ….. हैदराबाद ते पुणे महामार्गावर आसणा-या नरसी (ता. नायगांव) जि. नांदेड येथे प्रशांत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा नुक्ताच भव्य शुभारंभ झाला आहे . याप्रसंगी सरपंंच गजानन पा.भिलवंडे , पोलीस पाटील इब्राहीमबेग पटेल , संभाजी पा.भिलवंडे , रविंद्र पा.भिलवंडे , हाणमंत कोकणे , शिवाजी गुरुजी कोकणे , गंगाधर गंगासागरे (पत्रकार) , बालाजी तुप्पेकर , भास्करराव कोकणे यांशह गावातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळींनी उपस्थिती लावून प्रशांत मोटार ड्रायव्हिंग स्कूलसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या . यावेळी सर्व उपस्थित मान्यवर मंडळीचा प्रशांत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रवीणभाऊ कोकणे यांनी येथोचित्त सन्मान केला आणि ड्रायव्हिंग शिकण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रवेशितांना नाममात्र शुल्कात फक्त २६ दिवसांत परफेक्ट गाडी चालवण्यासाठी प्रशिक्षण देणार असल्याची माहिती देवून इच्छुकांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले त्याचबरोबर लायसन्स देखील काढून देणार असल्याचे जाहीर केले .

RELATED ARTICLES

Most Popular