नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे

यत्या काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या सर्कल व पंचायत समिती गणात भेटीगाठी घेताना दिसत आहे याच अनुषंगाने समाजवादी पार्टी व शेकापच्या कार्यकर्त्यांनी एक संयुक्त बैठक घेण्यात आली यामध्ये समाजवादी पार्टी नायगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समितीच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी ,यांनी दिली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश उपाध्यक्ष पी. डी. जोशी. व. जेष्ठ नेते .कमु भाई साहब.जिल्हाअध्यक्ष साजीद खुरेशी व.महानगरध्यक्ष आवेद पटेल साहब.यांच्या आदेशानुसार. समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी व शेकाप च्या वतीने नायगाव येथे एक छोटे खाणी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये समाजवादी पार्टी नायगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा सर्व ताकतीने लढविणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे माहिती विठ्ठल पाटील गवळी यांनी दिली यावेळी सफीखान पठाण तालुकाध्यक्ष समाजवादी पार्टी , प्रदीप झुंजारे युवा तालुकाध्यक्ष नायगाव, मेनूदिन भाई जिल्हा अध्यक्ष शेकाप, अब्दुल गफार भाई तालुकाध्यक्ष शेकाप , आजम शेख माजी जिल्हाध्यक्ष शेकाप, तात्या भालेराव शहर उपाध्यक्ष समाजवादी पार्टी, संतोष भालेराव युवा कार्यकर्ता ,इंगळे सर माजी सरपंच लालवंडी, पत्रकार आजम भाई, नागोराव गायकवाड ,हंसराज पाटील जाधव ,शेख इरफान ,शेख पाशा ,गंभीरबन होटाळा ,दिगंबर बट्टेवाड ,कपिल बट्टेवाड ,यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते








