HomeBlogकुंटूर पोलिसांची बाळेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई , घरातून देशी...

कुंटूर पोलिसांची बाळेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई , घरातून देशी व विदेशी दारूचे बॉक्स असे मिळून २२ हजार रुपयाचा मुद्दे जप्त …

कुंटूर पोलिसांची बाळेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई , घरातून देशी व विदेशी दारूचे बॉक्स असे मिळून २२ हजार रुपयाचा मुद्दे जप्त

नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यावर कुंटूर पोलिसांनी धाड टाकून ९२ दारूच्या बाटल्या व बियरचे काही बॉक्स जप्त केले असून त्यात २२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी दिली आहे.

गुप्त माहिती आधारे बळेगाव येथील गावांमध्ये नागेश दत्ता बेलकर यांच्या घरामध्ये दारूचे देशी दारूचे अवैध बॉक्स व बियर चे बॉक्स ठेवण्यात आले असल्याची अशी माहिती कुंटूर पोलिसांना मिळाली व त्या माहिती च्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या टीमने ही कामगिरी केली.यात पोलीस उप निरीक्षक मल्लिकार्जुन कोरामुंगे , बीट प्रमुख पवार, स्वामी ,महिला कर्मचारी सुनीता अलमोड,यांनी मिळून बळेगाव येथील बेलकर यांच्या घरावर धाड टाकून सदर देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. सदर मालाची किंमत २२ हजार रुपयांच्या वर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिले आहे. कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक गावांमध्ये अवैद्य धंद्याचा जोर वाढल्याने कुंटूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले व सर्व टीमने अक्शन मोडवर येत जोरदार कारवाईचा धडाका सुरू केले आहे. अवैध्य विक्रेत्यांचा मुजोरी व दबंग गिरी वाढत असल्याचे प्रकार संबंधित प्रशासनाला मिळताच संबंधित प्रशासनाकडून त्वरित कठोर पावले उचलत ही कारवाई करण्यात आली आहे. कुंटूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील अवैध वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.

व सर्वसामान्य गावातील नागरिक समाधान व्यक्त करत पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular