HomeBlogउमरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी घेतली दिलीपराव धर्माधिकारी यांची भेट....

उमरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी घेतली दिलीपराव धर्माधिकारी यांची भेट….

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

उमरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी घेतली दिलीपराव धर्माधिकारी यांची भेट….

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.जिल्हाध्यक्ष मा.दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी उमरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा,व संपूर्ण नगरसेवक यांनी भेट दिली आहें. सदर भेटीत नवनिर्वाचित नगराध्यक्षव सर्व नगरसेवकांचे सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आले आहे. उमरी नगरपरिषद हे आमदार राजेश पवार यांनी प्रतिष्ठेची तयार करून अगदी चुरशीची निवडणूक केली होती मात्र उमरी वासियांनी गोरठेकर परिवारावर पुन्हा विश्वास ठेवून २१ जागेपैकी १८ जागे वर विजय मिळवत भरगोस मतांनी विजय संपादित केले आहें. एक कैलास देशमुख गोरठेकर यांनी आमदारावर भारी पडले आहें. उमरी नगरपरिषदवर एकहत्ती सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कैलास देशमुख यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.

सदर निवडणुकीत भाजपाने एक आमदार एक उद्योजक सर्व भाजप पदाधिकारी श्याम दंड वापरून निवडणुकीच्या रिंगणात उतरून देखील आमदार राजेश पवार यांना पराभव पत्करावा लागला हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य राहिले आहे.उमरी वाशीयांनी संपूर्णतः भाजपला नाकारून राष्ट्रवादी काँग्रेस यांना पुन्हा पसंती देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेवर सत्ता राखण्यात उमरी मतदारांनी भरभरून मतदान करत भाजपला धोबीपछाड केले आहे. भाजपाला उमरी नगरपरिषदेवर केवळ एक जगावर समाधानी मानावी लागली आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.ऍड भाऊसाहेब गोरठकर, उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.शिरीषभाऊ गोरठेकर,मा.कैलासभाऊ गोरठेकर,माजी नगराध्यक्ष मा.सारडाजी, विष्णू पंडित शेट, व नवनिर्वाचित नगराध्यक्षा शंकुतलाताई मुदीराज, सर्व नगरसेवक यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर, बरबडा नगरीच्या उपसरपंच सौ.छायाताई धर्माधिकारी, धर्माधिकारी उपस्थित होते.

शिव महाराष्ट्र न्यूज संपर्क कार्यालय पत्ता चाफेकर चौक चिंचवड , पिंपरी चिंचवड पुणे मो .9689802102

RELATED ARTICLES

Most Popular