HomeBlogओबीसींचे आरक्षण गिळंकृत केले आहे : प्रा.हाके व ऍड.ससाणे

ओबीसींचे आरक्षण गिळंकृत केले आहे : प्रा.हाके व ऍड.ससाणे

ओबीसींचे आरक्षण गिळंकृत केले आहे : प्रा.हाके व ऍड.ससाणे

सातारा :

सध्याचे राजकारण हे ओबीसींचे असलेले आरक्षण गिळंकृत करणारे आहे.असा हल्लाबोल प्रा.लक्षण हाके ऍड.मंगेश ससाणे यांनी केला. जिल्हा ओ.बी.सी. संघटना व ओ.बी.सी.बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभागृहात ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.तेव्हा प्रा.हाके व ऍड.ससाणे यांनी चौफेर अशी तोफ डागली. अध्यक्षस्थानी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे होते.

ओबीसीचा म्होरक्या प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, “राज्यकर्त्यांनी निवडणुकीचा खेळ मांडला आहे.गावगड्याना बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण कुनबी-मराठ्यांनी खाल्ले आहे.बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते,योग्य माणसाच्या हाती संविधान दिले तर नंदनवन होईल.जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.अशी मागणी असुन सरकारने घोषणाही केली आहे.तरीसुद्धा ती होणार नाही. आता सत्ताधारी यांच्यामागे इतर पक्ष धावत आहेत.

उद्या काँग्रेसची सत्ता आली तर असेच चित्र आढळून येईल.मंडल आयोगामुळे ओबीसींना लाभ झाला आहे.मात्र,अजूनही समाजबांधवांना मंडल आयोग व संविधान याबद्धल माहिती नाही.अशी खंत व्यक्त करीत प्रा.हाके म्हणाले,आजही पालात राहणारी काही मंडळी आढळून येत आहेत. शिव,फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहिला नाही.सातारा जिल्हा हा बंडखोरांचा असताना आरक्षणामुळे मिळालेला हक्क जिल्हा परिषद अध्यक्ष व फलटण पंचायत समिती सभापती सत्ताधाऱ्यानी हिरावून घेतलेला आहे.सर्व तत्वांना तिलांजली दिली आहे. खरोखरच, सत्ताधारी मंडळींनी मुडदाच पाडला आहे. एकामेकांना धक्काबुक्की झाल्याची चर्चा होत असून आरक्षणावर कोण्हीही बोलत नाही. सर्व बहुजन समाज ७० टक्के एकत्रीत आला तर अधिकार खऱ्या अर्थाने प्राप्त होतील.

मतपेटीला राज्यकर्ते घाबरत आहेत. त्यामुळे त्यांची जागा दाखवली पाहिजे. मिरझापूर येथून लोकसभेसाठी फुलनदेवी निवडून आल्या होत्या.आपण तर शिकलेले लोक आहोत.आता सत्ताधारी वरचढ असले तरी सन २०२९ साठी सज्ज असले पाहिजे.

नक्कीच दिल्लीचे तख्त हासिल करण्यासाठी एकजूट राखली पाहिजे.” प्रा.हाके यांनी आ.शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बेकायदेशीर निवड झाल्याची सवित्तर अशी क्लिप सर्वांना ऐकवली. ओबीसी योद्धा अॅड. मंगेश ससाणे म्हणाले,”घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण सन २००२ चा कुनबी या शासन निर्णयामुळे ओबीसी राजकारण व्हेंटिलेटरवर आले आहे.यापुढे हळूहळू शिक्षण व नोकरी यातही संपुष्टात आलेले आढळून येईल.तेव्हा धोक्याची घंटा ओळखुन आरक्षण टिकविण्यासाठी संघर्षासाठी तयार असले पाहिजे. बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिला आहे. तेव्हा पेटून उठले पाहिजे.”जर लढायचेच नसेल तर सत्ताधाऱ्याना मनमानी कारभार करण्यासाठी आपण लिहून देऊया का ? अशीही खत त्यांनी व्यक्त केली. यावेळी भरत लोकरे यांच्यासह ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोरडे व वंचितचे नेते चंद्रकांत खंडाईत यांनी मनोगत व्यक्त केले. जयसिंगराव कुंभार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमोद क्षीरसागर यांनी आभार मानले. ओबीसी बहुजन एस.सी., एस.टी. व मायनॉरिटीमधील समाजास संविधानाने दिलेले अधिकार (आरक्षण) धोक्यात आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार ओबीसीच्या व बहुजनांच्या हक्कावर अतिक्रमण करुन आरक्षण धोक्यात आणलेले आहे. ते आरक्षण जिल्ह्यात कायद्याचे उल्लंघन करुन घेतलेली जिल्हा परिषद निवडणूक रद्द करुन ओबीसीच्या आरक्षणानुसार निवडणूका घेणेसाठी व मूळ ओबीसींना अध्यक्षपद देणे गरजेचे असताना झुंडशाही मोडीत काढणे गरजेचे आहे. तेव्हा सर्व ओबीसी, बहुजन, एस.सी.,एस.टी.,मायनॉरिटीमधील बांधवांनी एकत्र येवून लढा देणे गरजेचे आहे.यासाठी जिल्हा ओबीसी संघटनेने ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान आरंभलेले असून तालुक्यात ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ महाराष्ट्र भर झाला. संविधानिकदृष्ट्या ही निवडणूक बेकायदेशीर आहे. ओबीसी बहुजन समाजावर अन्याय करणारी आहे. ही निवडणूक रद्द करून नागरिकांचा मागासवर्ग महिला राखीव गटातून जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या ओरिजनल ओबीसी महिलांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करावी. या मागणीसाठी जिल्हा ओबीसी संघटनेने संविधान बचाव अभियान सुरू केले आहे. तरी जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्त मायनॉरिटी मधील सर्व ओबीसी बांधव यांच्यासह ज्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवलेले सर्व प्रतिनिधी व अन्यायग्रस्त ओबीसी बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असेही संयोजकातर्फे जाहीर करण्यात आले.फोटो : मार्गदर्शन करताना प्रा.लक्ष्मण हाके शेजारी ऍड.ससाणे,खंडाईत,कोरडे,लोकरे व राजेंद्र कांबळे.(छाया – अनिल वीर)

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

RELATED ARTICLES

Most Popular