
साताऱ्यात युद्ध विरोधी शांती संदेश सत्याग्रह संपन्न !
सातारा :
शहर व परिसरातील युद्ध-हिंसा विरोधी शांतिप्रिय नागरिक संघटना व प्रतिनिधी यांच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गेटच्या डाव्या बाजूला युद्ध विरोधी शांति संदेश सत्याग्रह संपन्न झाले. यावेळी,नको युद्ध हवे बुद्ध,नको हुकूमशाही हवी लोकशाही,नो किंग नो वॉर, ट्रम्पचे करायचे काय ? खाली डोके वर पाय …अशा आशयाच्या अनेक घोषणा विक्रांत पवार,प्रशांत झालटे आदींनी दिल्यानंतर सर्व उपस्थितांनी त्याच आवेशात प्रतिसाद दिला.प्रत्यक्ष सहभागी न झालेले जाणारे-येणारे मात्र पाहत होते.
युद्धामुळे सर्वत्र महागाई वाढली आहे.गॅस वेळेवर मिळत नाही.अजुन युद्ध राहिले तर विनाशकारी परिस्थिती ओढवणार आहे.तेव्हा युद्ध थांबण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावा.
अन्यथा,देशभर चाललेल्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी उपस्थितांनी सहमती दर्शवली.
यावेळी अस्लम तरडसरकर, विजय निकम, चंद्रकांत खंडाईत, रियाज शेख,रमेश इंजे,रेश्मा शेख,गणेश कारंडे, योगेश कांबळे,दिलाल शेख, संजय प्र. भोसले, प्रमोद पाटील, संदीप ढवळे, रामदास वाघमारे, अनिल वीर, माजी प्राचार्य रमेश जाधव,विजय गायकवाड, डॉ.आबासाहेब उमाप,सतीश गाडे, दिलीप सावंत आदी युद्ध विरोधी आम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलन कर्त्यांना चहा बी.एल.माने यांनी दिला तर थंडगार पाण्याच्या बाटल्या प्रशांत झालटे यांनी पुरवल्या.फोटो : युद्ध विरोधी शांति संदेश सत्याग्रहात सहभागी झालेले विक्रांत पवार व मान्यवर.
शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे







