HomeBlogसाताऱ्यात भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

साताऱ्यात भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

साताऱ्यात भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

सातारा :

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालु होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ.ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले,आ.शशिकांत शिंदे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक,जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी,विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. परिसरातील लायब्ररीचे औपचारिक ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

एवढ्या रखरखत्या उन्हातही भीमसैनिकांची अलोट अशी गर्दी उत्तरोत्तर वाढतच होती. पुतळा परिसरात विविध स्टॉल उभारण्यात आले होते.त्यामुळे भिम अनुयायी यांना दिलासा मिळत गेला.तिथे मात्र,ताक, रसना,पाण्याच्या बाटल्या, शिरा,लाडू, पोहे आदी नाष्टा मिळत होता. काही स्टॉलवर दालचा भात, मसाला भात वैगरे मिळत असल्याने जणु खाऊ गल्लीच अवतरली होती.

त्यामुळे अनुयायी यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही. अजित कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निळ्या रंगाचे १३५ फुग्याचा समूह आकाशात सोडल्याने विहंग दृश्य आढळून आले.पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

जयंतीतीच्या पूर्व संध्येलाही मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत अभिवादन करण्यात आले. सकाळी थेरो दिम्पकर (भन्ते) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला. समता सैनिक दलाने मानवंदना दिली.कसरतीचे खेळ,मोटार रॅली,विविध मंडळाने मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी,उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.फोटो : डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ना. शिवेंद्रसिंहराजे,सचिन कांबळे व त्यांची मुलगी.(अनिल वीर)

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

RELATED ARTICLES

Most Popular