
डॉक्टर यांनाही मन,भावना व इच्छा-आकांक्षा असतात : डॉ.राहुल जाधव
सातारा : वैद्यकीय सेवा रुग्णास डॉक्टर २४ तास अहोरात्र देत असतात.त्यामुळे आपल्या कामाची कोण्हीतरी दखल घ्यावी.असे मनोमन वाटत असते.कारण,डॉक्टर यांनाही मन,भावना व इच्छा-आकांक्षा असतात.असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल जाधव यांनी केले.
येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डे मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी सर्व डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन पुरोगामी लोकशाही विचार मंच, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिक्षक विभाग व वैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे होते.यावेळी व्यासपीठावर मनीषा साळुंखे,आफसाना बागवान,शिरीष जंगम,अनिल वीर,मनोज चाकणकर,सुरेश मुळीक,प्रकाश खटावकर अशोक काळे माधवी वरपे कारंडे सर विद्या पारखे संजय मी तनवरे मालन परळकर खापे काँग्रेसचे पदाधिकारी व पुरोगामी लोकशाही विचार मंचाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुषमा राजे-घोरपडे म्हणाल्या, “कोरोना काळात देवदूत म्हणून सर्वच शासकीय-खाजगी डॉक्टरांनी केलेल्या कार्यामुळे तुम्ही-आम्ही उभे राहिलो आहोत.त्यामुळे त्यांच्या ऋणात समाजातील सर्व घटकांनी राहिले पाहिजे.” यावेळी माधवी वरपे व मान्यवरांनी दिनाचे महत्व विशद केले.प्रथमतः दीपप्रज्वलन करण्यात आले. एन.सी.कारंडे यांनी स्वागत केले. श्रीकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले.सुजाता राजमाने यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी डॉ.राहुल कदम यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (स्त्री रोग तज्ञ) डॉ. अतुल लिपारे,बालरोग तज्ञ वर्ग-१ डॉ.उल्का झेंडे व डॉ.अरुंधती कदम,नेत्ररोग तज्ञ वर्ग-१ डॉ.चंद्रकांत काटकर, भुलशास्त्र तज्ञ निलेश वैद्य, समीर टकले,डॉ.स्मिता लोंढे, डॉ.साधना कवारे,प्रतीक गावडे,डॉ.अनुजा पवार, डॉ.प्रणाली भोसले,डॉ.प्रिया मेश्राम,डॉ. सायली सुपेकर,डॉ. देविका नायर,डॉ.संजीवनी शिंदे,अभिजित भोसले,डॉ. हृषीकेश शिवशरण,डॉ.ज्ञानेश्वर मोरे,डॉ.राहुल बने,विजयकुमार कुऱ्हाडे,डॉ. जयमाला लाटकर, डॉ.अभय कुऱ्हाडे,डॉ.अथर्व नलवडे आदी ४०डॉक्टरांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर काही डॉक्टर गैरहजर होते.सदरच्या कार्यक्रमास सर्व संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विद्या पारखे व नर्स,संजय नितनवरे व स्टाफ तसेच वैद्यकीय प्रेमी,रुग्ण वैगरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.







