HomeBlogश्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या कुटुंबीयास आम्ही वारकरी परिवाराचा मदतीचा हात…….नांदेड प्रतिनिधि...

श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या कुटुंबीयास आम्ही वारकरी परिवाराचा मदतीचा हात…….नांदेड प्रतिनिधि अशोक वाघमारे

वै.श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या कुटुंबीयास आम्ही वारकरी परिवाराचा मदतीचा हात..

नांदेड.
दि.२3 जून रोजी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी मंडळींनी वै.श्रीधर उर्फ बाळू पांचाळ (उत्कृष्ट गायक) सुप्रसिद्ध तबला वादक यांच्या कुटुंबीयास घुंगराळा येथे जाऊन सांत्वन पर भेट घेतली. वै.बाळू पांचाळ यांचे दि.२९ मे रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीच्या समयी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून “बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले” या मनीप्रमाणे संस्थेच्या वतीने मदतीचा एक हात पुढे करून संस्थेतील संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर व पदाधिकारी आज घुंगराळा येथे जाऊन बाळू पांचाळ यांचे कुटुंबियांची भेट घेत व त्यांचे वडील श्री गोपीनाथ पांचाळ यांच्या नावे संस्थेकडून आर्थिक मदत देण्यात अली आहे .

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,सचिव हभप व्यंकटराव महाराज माळकौठेकर,संस्थेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष हभप जगन्नाथ चक्रवार सावकार,सल्लागार हभप शिवाजी पांगरेकर, कोषाध्यक्ष हभप शिवाजी मदमवाड,राज्य प्रसिद्धी प्रमुख हभप चंपतराव डाकोरे, सदस्य बंडू पा.कदम,मुखेड तालुकाध्यक्ष हभप मारोती वडजे,नायगाव तालुका उपाध्यक्ष हभप शंकर आकले उपस्थित होते. आम्ही वारकरी परिवाराने केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular