HomeBlogडॉक्टर्स -डे निमित्त मिलेनियम पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टरांचा सन्मान….नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

डॉक्टर्स -डे निमित्त मिलेनियम पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टरांचा सन्मान….नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

विद्यार्थ्याकडून डॉक्टरांचा सन्मान…..

     नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्तबगार डॉक्टरांचा मिलेनियम पब्लिक स्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर- डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान केला आहे.

या स्तुत्य कार्यक्रमात अनेक डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना सकल मार्गदर्शन केले आहे. जीवनामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि सध्या परिस्थितीत युवक व्यसनाधीन होत चाललेले आहेत. हे फार दुर्दैवी असून स्वतःचे जीवन ठेवण्यासाठी व्यसने पासून दूर राहावे आणि जीवनामध्ये अमूल्लाबद्दल घडवायचा असेल तर शिक्षण घेतले पाहिजे असाही यावेळी मूलमंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
  यावेळी डॉ.सौं.मंजुषा चव्हाण, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. नयन कल्याण, डॉ.अंभोरे, डॉ. शिवाजी बिडवे, आधी उपस्थित होते व डॉक्टर डे निमित्त विद्यार्थ्याकडून भरभरून शुभेच्छा देऊन डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक देखील करण्यात आले आहे.
हा उपक्रम व डॉक्टरांचा सन्मान करण्यात संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनातून व प्रशासकीय प्रमुख प्रा. फाजगे सर यांच्या प्रेरणातून तसेच मिलेनियम पब्लिक स्कूलचे प्राचार्य वडजे सर, उप प्राचार्य जोशी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular