HomeBlogआमदार जितेश अंतापुरकर यांच्यावर अश्लील अपमानास्पद व आक्षेपार्हे भाषेचा वापर करणाऱ्याiवर तात्काळ...

आमदार जितेश अंतापुरकर यांच्यावर अश्लील अपमानास्पद व आक्षेपार्हे भाषेचा वापर करणाऱ्याiवर तात्काळ कारवाई करा… सकल मातंग समाजाची मागणी…. नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे.

Nand

 नांदेड,

 नांदेड जिल्ह्यातील राखीव मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्यावर काही विकृत समाजकंटक यांनी समाज माध्यमे व सार्वजनिक व्यासपीठावर ठिकाणी अश्लील अपमानास्पद आक्षेपार्हे भाषेचा वापर इतकेच नव्हे तर समाजातील महापुरुषाबद्दल आणि जातीचा खालच्या भाषेत वापर होत असल्याने सकल मातंग समाजाच्या वतीने नायगाव तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी तक्रारीच्या माध्यमातून संबंधितावर कठोर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे व आमदार जितेश अंतापुरकर व त्यांच्या कुटुंबीयांना वाय प्लस (y+8) सुरक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आमदार जितेश अंतापुरकर हे मातंग समाजातून असून ते सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील एकमेव राखीव मतदारसंघ असलेल्या देगलूर बिलोली मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि आमदार जितेश अंतापुरकर यांनी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण विषयी विधानसभेत संविधानिक व घटनात्मक रास्त मागणीची लक्षवेधी लावून धरली आहे.आरक्षणाचा फायदा केवळ एका विशिष्ट जातींना होत असल्याने प्रवर्गातील इतर समाज लाभापासून वंचित राहत आहे. व प्रवर्गातील इतर समाजाने अधिकारापासून वंचित राहत असल्याने मातंग समाजासह इतर अनेक समाज शिक्षणापासून व शासनाच्या इतर अधिकारापासून वंचित राहत असल्याने आरक्षणाचा फायदा केवळ एका समाजासाठी मर्यादित नसून संपूर्ण प्रवर्गाला फायदा झाला पाहिजे या आग्रही व रास्त मागणीची बाजू विधान मंडळामध्ये धरल्याने आमदार जितेश अंतापुरकर यांच्यावर आक्षेपार्य व अश्लील भाषेचा वापर समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.या विकृत कृतीचा सकल मातंग समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सध्या परिस्थित राज्यामध्ये अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा मोठा विषय असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तो विषय राज्याच्या दृष्टीने न्यायिक ठरल्याने त्यांचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहे. सदर उपवर्गीकरण लोकसंख्येच्या आधारे व सर्व समाजाची बाजू ऐकून घेऊन व आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जात समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. राज्यातील विद्यमान सरकारने सुप्रीम कोर्टाचा आदर करून यावर तात्काळ कारवाई करत अनंत बदर समितीची स्थापना करण्यात आली व बदर समितीने राज्यातील अनुसूचित  समाजातून हरकती मागविल्या  आहे. त्यानुसार बदर समितिने राज्य सरकारकडे अहवाल सादर केले आहे. अहवालांचा आदर घेत राज्य सरकारने दोन महिन्याच्या आत राज्यातील अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण लागू करण्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याने राज्य सरकारच्या निर्णयाच्या भूमिकेमधून काही समाजातील विकृत लोकांनी जाणीवपूर्वक  समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आमदार जितेश अंतापुरकर यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील अपमानास्पद व आक्षेपार्य भाषेचा वापर करत आहे.अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजामध्ये तेढ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जागृत सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड आणि संपूर्ण तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून संबंधितांवर कठोर व फौंजदारी कारवाई व आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह कुटुंबीयांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्याची मागणी यातून करण्यात आली आहे.

यावेळी भाऊसाहेब भालेराव ( माजी जि.प.सदस्य ),पंढरी भालेराव (माजी नगराध्यक्ष नायगाव ),दयानंद भालेराव नगरसेवक नायगाव, विजय भालेराव (नगरसेवक), शरद भालेराव (नगरसेवक), प्रवीण भालेराव,( जिल्हा अध्यक्ष फकीरा ब्रिगेड),दत्तात्रय आईलवार (सरपंच सुजलेगाव,) कैलास भालेराव (सामाजिक कार्यकर्ते), प्रवीण नेहरू, मधुकर आईलवार,गंगाधर भालेराव, अंबादास गोरे,सोमनाथ बैलके,साईनाथ देवकांबळे, साईनाथ नामवाडे, अविनाश भालेराव यासह सकल मातंग समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular