
पशुधन संरक्षणासाठी कृषीकन्यांची पुढाकाराची मोहीम; लालवंडीत लंपी लसीकरण
नांदेड प्रतीनीधी,
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे कृषी महाविद्यालयाच्या मार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक संलग् न अंतर्गत लंपी रोगावर लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लंपी रोगावर लसीकरण, जंतनाशक आदी कामे लालवंडी गावात करण्यात आली.
लालवंडी येथे सदरच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना लंपी रोगाचे लक्षण व उपाय यावर मार्गदर्शन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या वतीने करण्यात आले.
यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. संजय आलामवार यांच्यासह त्यांची विशेष टीम या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, सदरील कार्यक्रम डॉ. लवेकर, डॉ. नादरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. घुबे सर, प्रा. नागणीकर सर रावे कार्यक्रम समन्वयक, प्रा. डॉ. नीता देवकत्ते मॅडम रावे कार्यक्रम अधिकारी, प्रा. नाईक सर,प्रा. डॉ. जंगिलवाड मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टीमने व सर्व कृषीकन्यानी परिश्रम घेतले.




