
समृद्धी पदमावार व मकरंद,शिवन्या झुंजारे यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूरच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
नांदेड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वी,2026 च्या निकालात जिल्हा परिषद हायस्कूल, कुंटूर ता. नायगाव, जि. नांदेड येथील विद्यार्थी मकरंद रत्नाजी झुंजारे व समृद्धी पदमावार याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मकरंदने एकूण 300 पैकी 164 गुण 54.66 टक्के मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली. पेपर–1 प्रथम भाषा व गणित मध्ये 80 गुण, तर पेपर–2 तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 84 गुण मिळवत त्याने आपल्या मेहनतीचा ठसा उमटविला.तसेच समृद्धी विनायक पदमावार याही विध्यार्थीनिने घघवीत यश संपादन केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकतात , हे मकरंद झुंजारे, समृद्धी विनायक पदमावार, शिवन्या झुंजारेच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी – 2026 च्या अंतरिम निकालात जिल्हा परिषद हायस्कूल, कुंटूर ची विद्यार्थिनी शिवन्या रत्नाजी झुंजारे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिवकन्याने परीक्षेत एकूण 300 पैकी 138 गुण 46 टक्के मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. यामध्ये पेपर-1 प्रथम भाषा व गणित) मध्ये 66 गुण, तर पेपर-2 तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये 72 गुण मिळवले आहेत.या यशामागे पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची सातत्यपूर्ण मेहनत मोलाची ठरली.मकरंद झुंजारे,समृद्धी विनायक पदमावार,शिवन्या झुंजारे या तीनही विध्यार्थ्यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषद हायस्कूल, कुंटूरचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी त्याचे शॉल, श्रीफळ पुष्पहार घालून अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




