HomeBlogदिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहातुन संत गोरोबा आश्रम...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहातुन संत गोरोबा आश्रम शाळेत शालेय साहित्याचे वाटप…नांदेड प्र. अशोक वाघमारे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहातुन संत गोरोबा आश्रम शाळेत शालेय साहित्याचे वाटप…

नांदेड प्रतिनिधी,

कुंडलवाडी,दि.27 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिवंगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त दि.22 ते 28 जुलै या कालावधीत राज्यभर जनसेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कुंडलवाडी येथील संत गोरोबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शालेय बॅग वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शालेय बॅगचे वितरण करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,त्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचा पक्षाचा हा सामाजिक उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला जयंतीनिमित्त होणारे जिल्ह्यामधील जनसेवा सप्ताहच्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे असे होटाळकर यांनी यावेळी म्हणाले
यावेळी कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे,बिलोली तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे,श्रीनिवास पाटील नरवाडे,नगरसेवक मारुती कोटलावार,बिलोली शहराध्यक्ष मिलिंद मांजरमकर,नीलकंठ पाटील दूंडले,कुंडलवाडी शहराध्यक्ष गंगाधर मरकंटे,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष एच.बी.गायकवाड,महा लाईव्हचे संपादक यादवराव लोकडे, बिलोलीचे रीलस्टार सुमेर पटेल, माणिक पाटील हिवराळे,बी.एस.मठपती सर,मा सरपंच प्रल्हाद पाटील,विलास पाटील शिंदे,आनंदराव कवडेकर,दत्ताहरी पाटील शिंदे,विठ्ठल देवराव पाटील शिंदे,सूर्यकांत पाटील आगलावे,दिनेश पाटील गादगे,माधव कांबळे नागणीकर,आनंद पाटील शिंदे,प्रकाश पाटील बेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,गावकरी नागरिक,शाळेचे शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा पक्षाचा संकल्प असून,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular