HomeBlogदुगांवची कन्या ठरली राज्याची गुणवंत;स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार गौरव.......

दुगांवची कन्या ठरली राज्याची गुणवंत;स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार गौरव…. नांदेड, अशोक वाघमारे

दुगांवची कन्या ठरली राज्याची गुणवंत;
स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार गौरव



नांदेड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीमध्ये गुणवत्तेच्या जोरावर दुगांव नगरिची भूमिकन्या श्रेया नागोराव कबनूरे हिने ८४.५६ टक्के गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १४वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात येणार आहे.
बिलोली तालुक्यातील दुगाव येथील श्रेया नागोराव कबनूरे सध्या नांदेड येथील नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. शहरी भागातील सीबीएसई माध्यमातून शिक्षण घेत तिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान निर्माण करत श्रेयाने राज्य गुणवत्ता यादीत १४वा क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबासह दुगांव आणि नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक लौकिकात भर घातली आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनीने शहरी व सीबीएसई माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने श्रेयाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला आहे. श्रेयाच्या राज्यस्तरीय यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके, सपोनि पुणे अनिता साळूंके, संचालक माधव पाटील नरवाडे, बळवंत पोलीस पाटील कदम, विलास पाटील पुयड, पत्रकार बालाजी हिवराळे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक मारोती खैरगावे, यादव गुरुजी साळुंके, गोडबोले सर, आनंदराव गुरूजी वाघमारे, शेषराव गुरूजी भंडारे, शंकर हसगूळे सर, श्रीपत पाटील साळुंके, माधव पाटील कबनुरे, रमेश गुरूजी साळुंके, दिगांबर गुरुजी साळूंके, व्यंकट गुरूजी साळूंके, शिवाजी गुरुजी जाधव, बालाजी गुरूजी जाधव, बालाजी गुरूजी खैरगांवे, मानसिंग गुरूजी कदम, पांडुरंग गुरुजी भंडारे, इंजिनिअर जैनोदीन शेख, चेअरमन माधवराव पाटील जाधव, सुर्यकांत पाटील जाधव, मा सरपंच बालाजी पाटील कदम, सरपंच प्रतिनिधी शंकरराव पाटील जाधव, मा प. स. सदस्य संभाजी शेळके,उपसरपंच देविदास भंडारे, मारोतराव पाटील साळूंके दत्तराम पाटील साळूंके, शिवाजी पाटील साळूंके, हनमंत पाटील कदम, बालाजी पाटील साळूंके, आनंदराव पाटील कबनुरे, संग्राम पाटील पुयड,व्यंकटराव पाटील शिंदे, डॉ राजीव भंडारे, सैनिक ज्ञानेश्वर शेळके,तानाजी पाटील शिंदे, पत्रकार प्रल्हाद भंडारे, साहेबराव मोकमपल्ले, राजीव पांचाळ ,लक्ष्मण नांगरे, बंटी रायकवाड, फेरोज शेख, नागनाथ पंगेवार,‌ प्रल्हाद रायकवाड, यांच्यासह दुगाव ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.

(चौकट
दुगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारी श्रेया ही दुगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. श्रेयाच्या या कामगिरीने ‘गावातील गुणवत्तेला संधी मिळाली तर ती राज्याच्या पातळीवरही झेप घेऊ शकते’ हा विश्वास दृढ झाला आहे. )

RELATED ARTICLES

Most Popular