HomeBlogनायगाव विधानसभा मतदारसंघात 89.16 टक्के मतदारांचे गणना प्रपत्र जमा... नांदेड, अशोक वाघमारे

नायगाव विधानसभा मतदारसंघात 89.16 टक्के मतदारांचे गणना प्रपत्र जमा… नांदेड, अशोक वाघमारे

नायगाव विधानसभा मतदारसंघात 89.16 टक्के मतदारांचे गणना प्रपत्र जमा

नांदेड (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नायगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गणना प्रपत्र भरून घेण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2026 आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 7 हजार 533 मतदार असून, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 2 लाख 74 हजार 186 मतदारांचे (89.16 टक्के) गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहेत.
तर 32 हजार 793 मतदारांचे (10.66 टक्के) गणना प्रपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. यामध्ये घरभेटीदरम्यान सापडू न शकलेले, गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंदणी झालेले किंवा आधीच नोंदणी असलेले मतदार यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार नायगाव तालुक्यात 1 लाख 34 हजार 917, उमरी तालुक्यात 73 हजार 621, तर धर्माबाद तालुक्यात 65 हजार 648 मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले आहेत.
मतदारसंघातील 3 लाख 7 हजार 533 मतदारांपैकी 3 लाख 6 हजार 979 मतदारांबाबत (99.82 टक्के) मतदार यादीसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित 554 (0.18 टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही बाकी आहे.
गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांच्या नावांची यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. ही यादी जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गणना प्रपत्र जमा न झालेल्या मतदारांच्या वास्तव्याबाबत संबंधित मतदार किंवा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना माहिती असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना प्रपत्र भरून घेता येणार आहे.
ही माहिती नायगावच्या तहसीलदार धमपिर्या गायकवाड मॅडम यांनी दिली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular