
शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणार — राजेश देशमुख कुंटूरकर
नागपंचमी दिनी अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती !
नायगाव प्रतीनिधी
शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणार – राजेश देशमुख कुंटूरकर ————- ————- नागपंचमी दिनी अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती ! ————- ——– नायगाव प्रतीनिधी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्याने आपल्या ऊस उत्पादनासाठी आमच्या याच कारखान्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत ही “कामधेनू” जोपासण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचा विश्वास कारखाण्याचे चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शेतक-यांसी बोलतांना व्यक्त केला . कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. चेअरमन तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख होते. यावेळी किशोर देशमुख, आंबादास धर्माधिकारी, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिरीष गोरठेकर, कैलास देशमुख गोरठेकर, भगवानराव मनूरकर, कारखान्याचे संचालक रुपेशभैया देशमुख, वसंत सुगावे, उमाकांत देशपांडे, प्रकाश पाटील भिलवंडे, संदीप कवळे, सूर्याजी पाटील चाडकर, शिवाजी होळकर, बाबूराव आडकीने, सूर्यकांत कदम, रमेश कदम यांच्यासह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजेश देशमुख कुंटूरकर म्हणाले की, १३२ गावांच्या सहकार्याने माजी मंत्री तथा खासदार कै. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना उभारला. त्यांच्या विचार व संकल्पनेनुसार हा कारखाना सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपामध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे मात्र माझी दोन वेळा संधी हुकली, आता तिसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कृषीविषयक धोरणांचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथेनॉल निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत असून आगामी काळात शेतकऱ्यांची भक्कम साथ मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करू, असा आशावाद व्यक्त केला.नागपंचमीच्या शुभदिनी आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्याला परिसरातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.
कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. चेअरमन तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख होते. यावेळी किशोर देशमुख, आंबादास धर्माधिकारी, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिरीष गोरठेकर, कैलास देशमुख गोरठेकर, भगवानराव मनूरकर, कारखान्याचे संचालक रुपेशभैया देशमुख, वसंत सुगावे, उमाकांत देशपांडे, प्रकाश पाटील भिलवंडे, संदीप कवळे, सूर्याजी पाटील चाडकर, शिवाजी होळकर, बाबूराव आडकीने, सूर्यकांत कदम, रमेश कदम यांच्यासह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना राजेश देशमुख कुंटूरकर म्हणाले की, १३२ गावांच्या सहकार्याने माजी मंत्री तथा खासदार कै. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना उभारला. त्यांच्या विचार व संकल्पनेनुसार हा कारखाना सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपामध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे मात्र माझी दोन वेळा संधी हुकली, आता तिसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कृषीविषयक धोरणांचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथेनॉल निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत असून आगामी काळात शेतकऱ्यांची भक्कम साथ मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करू, असा आशावाद व्यक्त केला.नागपंचमीच्या शुभदिनी आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्याला परिसरातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.




