
प्राचार्य श्री के.व्ही.फाजगे सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा नायगाव येथे संपन्न
नांदेड,
नायगाव,दि. 17 ऑगस्ट 2026 :
नायगाव नगरपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या यमुनाबाई माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,नायगाव येथील विद्यार्थिनींचा आज उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्रुतिका नागोराव कोठाळे हिने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. यशोदा नागोराव बेंबरे हिने द्वितीय,तर समीक्षा यादवराव शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला.या तिन्ही गुणवंत विजेत्या विद्यार्थिनींना श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय प्रमुख तथा प्राचार्य के.व्ही.फाजगे सर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्य के.व्ही. फाजगे सर यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा विकास करावा.* “श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ,होटाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. शिवराज पाटील होटाळकर साहेब यांचे संस्थेतील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना वेळोवेळी मिळणारे अमूल्य मार्गदर्शन,प्रेरणा आणि प्रोत्साहन हेच विद्यार्थ्यांच्या यशामागील महत्त्वाचे बळ आहे.या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत आहे,”असे फाजगे सरांनी नमूद केले.
विद्यार्थिनींनी मिळविलेले हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संस्थापक अध्यक्ष श्री.शिवराज पाटील होटाळकर साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून, संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडत असलेल्या शैक्षणिक संस्कारांचे फलित आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला निश्चितच नवी प्रेरणा मिळते.विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘हर घर तिरंगा’अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना,राष्ट्रीय एकात्मता आणि आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण करण्यासाठी घेण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यास सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वडवळे सर,परीक्षा विभाग प्रमुख श्री.बापूले एस.एस.सर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.




