
आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात निषेध मोर्चा……
नांदेड प्रतिनिधी,
नांदेड | दि. ५ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज (दि. ५ ऑगस्ट) नांदेड येथील आयटीआय कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी निषद मोर्च्यातून उपस्थितांना संबोधित करताना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षानी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांना नांदेडमध्ये अथवा राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा दिला.आणि काँग्रेस पक्षाला जशाला तसे उत्तर देण्याची हिम्मत आमच्यात आहे.तसेच राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नांदेड महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा ,माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर ,उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर,नांदेड कार्याध्यक्ष माधव पावडे,प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,सुनील नानवटे,मोहम्मद खान पठाण,शिरीष देशमुख गोरठेकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर,उत्तमराव सोनकांबळे,महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई जोगदंड,डॉ.मीनाक्षीताई कागडे,ॲड.एजाज मॅडम,युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे,लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी,धर्माबाद तालुकाध्यक्ष दीपक पाटील कदम,बाबुराव पाटील कदम,नारायण पाटील पवार, देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार,देगलूर शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार,नगरसेवक स्वप्निल लुंगारे,मोहसीन खान पठाण,नेताजी भोसले,नगरसेविका सुमन कांबळे,गजू कांबळे,आनंदराव पाटील शिंदे,आनंदराव पा हेंडगे,श्रीपत पाटील शिंदे,सटवाजी मामा मोदलवाड,बाबुराव परतवाड मामा,प्रकाश पाटील बेलकर,प्रदीप पाटील पवळे,माधव पाटील उपासे,श्रीकांत पाटील शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माजी आमदार, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




