
नरसीत भाजप जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांचा सत्कार; कार्यकर्त्यांशी संघटन बळकटीवर चर्चा
नायगाव प्रतिनिधी —
भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनी गुरुवारी (ता. ६) नरसी येथील भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्रावण पाटील भिलवंडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन हंबर्डे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे व बालाजीराव शेळगावकर यांचाही गौरव करण्यात आला.
या भेटीप्रसंगी जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी तळागाळातील जनसंपर्क वाढविण्याची गरज अधोरेखित केली. आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम, जनहिताचे प्रश्न आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांबाबतही यावेळी चर्चा झाली.
कार्यक्रमास माजी सरपंच दत्ता पाटील होटाळकर, बालाजी सावकार चिंतावार, ज्येष्ठ पत्रकार भूषण पारळकर, वसंत कसतूरे, साईनाथ अक्कमवाड, ज्येष्ठ पत्रकार गोविंद टोकलवाड, गंगाधर गंगासागरे, सय्यद अजीम, राम खनपटे, राजू वडगावे, विनोद पाटील भिलवंडे, रमेश वडगावे, दिगांबर पाटील भिलवंडे, अनिल वडगावे, महंमद शेख, राहुल भेदे, सुलतान शेख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.





