HomeBlogश्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे महान गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या...

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे महान गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम…..

महाराष्ट्र न्यूज संपादक, सुदर्शन वाघमारे

*वाळूच्या शिल्पांतून गणित जिवंत झाले!” – कृतीतून अध्ययनाचा अनोखा अनुभव*

महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून एक विशेष व नाविन्यपूर्ण गणित उपक्रमाचे आयोजन हायस्कूल मधील गणित विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना अधिक सोप्या, सुलभ व परिणामकारक पद्धतीने समजाव्यात, तसेच कृतीतून अध्ययन (Activity Based Learning) या संकल्पनेद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमात मांजरा नदीच्या वाळूच्या शिल्पांचा प्रभावी वापर करून विविध गणितीय संकल्पना प्रत्यक्ष कृतीद्वारे सादर करण्यात आल्या. वाळूच्या शिल्पांमधून गणित दृश्य, अनुभवात्मक व अत्यंत मनोरंजक स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.या उपक्रमामध्ये शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी व १० शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाळूच्या शिल्पांच्या माध्यमातून एकूण ४० गणितीय उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.संस्थेचे चेअरमन आदरणीय आण्णा यांनी याचे अवलोकन करून विद्यार्थी व सहभागी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास गणित व विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री सुभाष देगलूरकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्यांसह केंद्रप्रमुख व विषय तज्ञांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनाचा वेगळा, आनंददायी व परिणामकारक अनुभव मिळाला. उपस्थित सर्व शिक्षक. श्री गुंडपवार सर ,श्री मालू वानोळे सर ,श्री माचापुरे सर ,श्री आंबटवार सर ,श्री बोधनकर सर ,श्री भंडारे सर ,श्री कांजाळकर  सर ,श्री फुलेवार सर ,मुख्याध्यापक गायकवाड सर, सहा.मुख्याध्यापक विभुते सर ,सुपरवायझर नरडेवार सर ,श्री आकाश शिंदे सर, या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच गणित विषयाच्या शिक्षकांनी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

श्री महाराष्ट्र न्यूज . ऑफिस पत्ता चाफेकर चौक चिंचवड पुणे येथे संपर्क साधावा .. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधावा ..9689802102

RELATED ARTICLES

Most Popular