नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.


नांदेड, नायगांव.
कुष्णूर एमआयडीसी परिसरात बिबट्याने केला तरुणावर हल्ला.
नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे.
नायगाव नजीक असलेली औद्योगिक महामंडळ वसाहत कुष्णर परिसरात आज बिबट्याने एका तरुणावर हल्ला करत त्या तरुणावर बिबट्याने पंच मारल्याने तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणांचे नाव श्रीकांत पोपुलवाड असून श्रीकांत यांच्या पाठीवर व छातीवर बिबट्याने पंच मारत हल्ला चढवला आहें.
जखमी श्रीकांत पोपुलवाड यांच्यावर घुंगराळा येथील डॉ. राठोड यांच्या खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. सदर हल्ल्यात जखमी श्रीकांत पोपुलवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांची भेट घेऊन सदर घटनेची माहिती दिली असता वसंत पाटील सुगावे यांनी त्वरित वनपरिक्षेत्राधिकारी देवकते यांना संपर्क साधून जखमी श्रीकांत पोपुलवाड यांची माहिती दिली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी देवकते यांनी याबाबतची दखल घेऊन हल्लाखोर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी करण्यासाठी वन विभागाची टीम येऊन कूष्णूर, घुंगराळा परिसरात बिबट्यांचा शोध घेतला आहे. मात्र बिबट्या आढळल्या नसल्याने या परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी,शाळकरी कर्मचारी, शाळकरी मुलं सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने कारण्यात आले आहें. व या परिसरात बिबट्या कुठे आढळून आल्यास त्वरित आमच्याशी संपर्क करावे अशी वन विभागाकडून सांगण्यात आले आहें.







