
गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश ….
नांदेड प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल नायगाव शाळेनी घवघवीत यश संपादन केला आहे.
एप्रिल २०२६ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल चे एकूण १६ पात्र विद्यार्थीनी परीक्षेत बसले होते. त्यापैकी अकरा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत अकरा विद्यार्थ्यांनी गौरवशाली नाव कमावत मोठ्या प्रमाणात मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.यात कु.उत्कर्षा उमेश चव्हाण,पृथ्वीराज शिवराज दरेगावे,अथर्व प्रदीप करमाळे,अजिंक्य चंद्रकांत लखपत्रेवर,कु.अमृता गंगाधर नरवाडे,पुनम ज्ञानेश्वर पांचाळ,
कृष्णा सचिन इंगळे,आरव माधव चव्हाण,काव्या कैलाश कोलमवर,
जीशान रझा जावेद शेख,मुस्तकीन गुलाम मोहियोद्दीन बदलानी.इत्यादी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याने संस्थेचे संचालक संतोष कल्याण, व संचालिका कल्याण मॅडम,आणि शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून व परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल नायगाव शहरातून व परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसून येत आहे.




