
जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!
भोकर प्रतिनिधी/
भोकर – गोल्ला-गोलेवार यादव समाजातील कर्तव्यदक्ष, वरीष्ठ अधिकारी आदरणीय श्री. जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP म्हणून नियुक्ती होऊन त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा भोकर येथे गोल्ला-गोलेवार यादव महासंघाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ करण्यात आला, मा.जगदीश भंडरवार साहेब यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या उज्ज्वल सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भोकर उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, जनतेला न्याय मिळेल आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष आक्केमवाड साहेब बोलताना म्हणाले की हा सत्कार केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून, संपूर्ण गोल्ला-गोलेवार यादव समाजाच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा गौरव करणारा अविस्मरणीय क्षण ठरला, आपल्या प्रामाणिक कार्यपद्धतीने, निस्वार्थ सेवाभावाने, शिस्तबद्ध प्रशासनाने आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे श्री. जगदीशजी भंडरवार साहेब यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांनी केले आहे.
यावेळी- गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, जिल्हाध्यक्ष प्रकाश करेवाड, मुदखेड उपसभापती आनंदराव गादीलवाड, जि. कार्याध्यक्ष सुभाषराव शिलेवाड, जि.सचिव अशोकराव काराळीकर, बालाजी शेणेवाड ,कोशाध्यक्ष तुकाराम कैलवाड,युवा जिल्हाध्यक्ष सुनील कोईलवाड, तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड,श्याम जक्कलवाड,संजय बल्फेवाड, दत्ता क्यातमवाड,गंगाधर पाशेमवाड, महेश पपूलवाड,गोविंद यमलवाड,दत्तराव पासेमवाड,गोविंद चिखलवाड, ज्ञानेश्वर कारलवाड,नारायण पापुलवाड,शिवाजी कारलवड उपस्थित होते.







