
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व अन्नदान वाटप…
नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे…..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व अन्नदान वाटप आणि बिसलेरी पाणी बॉटल चे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई शिवाजीराव काकडे यांच्या आयोजनातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व सदर कार्यक्रमात एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक आदर्श घालत जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे. यात प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मीनाक्षीताई काकडे, डॉ. शिवाजीराव काकडे, मनीषा कांबळे,राजेंद्र बनसोडे, ममता बाराळीकर, यासह एकूण ३२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवंतांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ज्ञानपीठ व्यासपीठावरून बोलत असताना म्हणाले आयोजक डॉ.मीनाक्षीताई कागडे यांचा स्तुत्य आणि बहुजन समाजाला आदर्श घालून देणारा उपक्रम असून समाजात समता बंधुता एकता चे दर्शन घडवणारा हा उपक्रम असून या उपक्रमात आपण सर्वजण सामील होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याच भाग्य आपणास प्राप्त झाले यापेक्षा जीवनात कुठलाही आनंद मोठा नाही.म्हणून डॉ.मीनाक्षीताई कागडे यांनी वेळोवेळी समाजातील गोरगरीब आणि उपेक्षित वर्गांना अंजना हॉस्पिटलच्या माध्यमातून व त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सरसावत असतात ही अभिमानाची आणि तेवढीच कर्तृत्वाची बाब आहे.यावेळी आमदार चिखलीकर यांनी म्हणाले. यावेळी मा.आ. मोहन अण्णा हंबर्डे, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, मा. आ.अविनाश घाटे, मा.आ. सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज पा. होटाळकर, बाळासाहेब पा. रावणगावकर वसंत पा. सुगावे माधव पा.पावडे,व्यंकटराव पा. गोजेगावकर,डॉ. उत्तमराव सोनकांबळे, दिलीपराव धर्माधिकारी, शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर, भास्कर पाटील भिलवंडे, कैलास देशमुख, सुरेखाताई पाटील, सुनंदाताई जोगदंड,अँड भीमराव सोनकांबळे, शरद पवार, शकुंतला ताई मोतीराज, विजयाताई टेकाळे, शाबीर चाऊस, हबीब बाऊजीर, राजेश पा. कदम, सुरेखाताई बनसोडे, सोनालीताई हंबर्डे, रोहन कांबळे, मोहसीन खान, प्रदीप कुमार कांबळे, यासह विविध मान्यवर कार्यकर्त्यांची व आंबेडकरवादी अनुयायांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्या डॉ मीनाक्षीताई शिवाजीराव कागडे यांच्यावतीने करण्यात आले होते.



शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे..







