
डोंगरगाव येथे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लागली गावात आग आगीत जल जीवन चे पाईप व पाच हजार कडव्याची गंजी जळून खाक
नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे…
नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे दुपारी बाराच्या दरम्यान अचानक अति तापमानामुळे व उष्णघातामुळे आग लागल्याची धक्कादायक घटना आज दि. ३० एप्रिल रोजी घडली आहे. जल जीवन मशीन चे पाईप व ५००० कडव्याची गंजी जळून खाक सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नसून गावकऱ्यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटना घडतात सतत प्रशासनाला मदत कार्यासाठी संपर्क केले असता अध्यापही अग्निशामक दलाची गाडी आलेले नसून गावकऱ्यांच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे सध्या परिस्थिती पाहता पाण्याची कमतरता भासत असून गावामध्ये लाईट पण बंद झालेले आहे त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकत नाही अग्नीच्या उष्णतेमुळे व सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे आग आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांच्या वतीने संतापाची लाट सुरू आहे. आपत्कालीन व्यवस्था कुठल्याही प्रकारची मदत करण्याऐवजी फोन देखील उचलत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. डोंगरगाव येथे भयानक पणे आगीचा भरकाव झाल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. तापमानाचे प्रमाण अधिक असल्याने आजूबाजूंचा घरांना धोका होईल अशा पद्धतीची वास्तविक घटना पुढे आली आहे. मात्र गावकऱ्यांनी या अलीकडे धाव घेत मोठ्या प्रमाणामध्ये आगविजनाचे प्रयत्न पूर्णपणे होत आहे. मात्र प्रशासनाच्या अति दुर्लक्ष कोणामुळे अशा अति तापमानामध्ये अशी घटना दुर्दैवी पण सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही गावकऱ्यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळल्याचे पायाला मिळाले आहे.
शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे







