नायगाव तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत – जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर
दि. २८ एप्रिल रोजी मौजे होटाळा (ता.नायगाव,जि. नांदेड) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. प्रारंभी क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्प अर्पण करून पंचशील ध्वजास मानवंदना देऊन अली आहे. आणि जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांचा यथोचित सन्मान सोहळ्यांच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.श्री.शिवराज पाटील होटाळकर होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी त्यांच्या कार्याचा व शिक्षणाचा आदर्श घ्यावा,असे आवाहन केले. व “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा”हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आजही तितकाच महत्त्वाचा असून तो प्रत्येक तरुणाने आचरणात आणणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले. यावेळी सोहळ्यास उपस्थित मा.चेअरमन शिवाजी पाटील पवार,सरपंच गणेश पाटील पवार,उपसरपंच शरद पाटील पवार,पोलीस पाटील श्रीराम पवार, राजेश पाटील बावणे,मा उपसरपंच गणेश भद्रे, चंद्रकांत पाटील पवार,संजय भद्रे,माधव वाघमारे,बाबुराव इंगळे,समता सैनिक,गंगाधर सोंडारे,विश्वंभर कांबळे,कपिल पाटील भद्रे,किशन कांबळे, उपस्थित जयंती मंडळ कार्यकारणी बळीराम गोविंदराव शेरे अध्यक्ष,अशोक खंडूराव वाघमारे उपाध्यक्ष,यादव शंकरराव भद्रे कोषाध्यक्ष,यासह उपस्थित मान्यवरांनीही बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारधारेचा प्रसार करण्याची गरज असल्याचे भावना व्यक्त केली. यावेळी गावातील नागरिक, महिला सह तरुण तरुणी कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. व जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे








