HomeBlog*दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांचे पक्षासाठी खूप मोठे योगदान  ---  आमदार प्रतापराव पाटील...

*दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांचे पक्षासाठी खूप मोठे योगदान  —  आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर*======================दिलीप धर्माधिकारी (मालक) बरबडेकर यांना पक्षाने तिकीट जाहीर करावे अशी बरबडा सर्कल जनतेची मागणी…

नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे.

नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल येथे राष्ट्रवादी अजित पवार गट आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी २०२५ अनुषंगाने सह विचार सभा दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, वसंतराव सुगावे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार तथा आमदार यांनी दिलीपराव धर्माधिकारी यांचे योगदान पक्षासाठी मोठा आहे त्यांनी पडघरीच्या काळात अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत प्रमाणितपणे पक्षाचे काम परिसरात करून एकनिष्ठता दाखवली माझी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काम केले यांच्या कार्याची दखल घेऊन निश्चितच पक्षश्रेष्ठी बरबडा सर्कल मधून राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट देण्यासाठी सकारात्मक असेल आम्ही निश्चितच पक्षाकडे दिलीप धर्माधिकारी यांची बाजू पक्ष घेईल असे उद्गार माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी यावेळी म्हणाले .

बरबडा सर्कल हा सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून युवा कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांची पत्नी देखील इच्छुक म्हणून आहेत. वसंत सुगावे पाटील यांचा देखील या सर्कलमध्ये मोठी पकड असल्याने सुगावे यांच्या जनसंवादातून वाढत चाललेला जनाधार हा आगामी निवडणुकीसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे देखील जनतेकडून बोलले जात आहे. बरबडा सर्कल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून दिलीपराव धर्माधिकारी यांची पत्नी व वसंत पाटील सुगावे हे दोन इच्छुक उमेदवार असून दोघांचाही जनसंपर्क चांगला असल्याने नेमकं पक्षश्रेष्ठी कोणाला तुम्ही देईल हा देखील विषय चर्चेचा राहणार आहे.

या सर्कलमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. या तुलेबल लढतीत मतदार राजा कोणाचे पारड्यात आशीर्वाद टाकेल हे मात्र अजून पर्यंत स्पष्ट दिसून येत नाही. कारण या सर्कलमध्ये काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची ताकद मोठी असल्याने येथून तिने उमेदवार तगडे राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हणाले दिलीपराव धर्माधिकारी यांचे या सर्कल साठी मुलांचे योगदान राहिले असून तळागळातील जनतेचा सहवास त्यांच्यासोबत राहिला आहे.

तळागाळातील जनतेसोबत नाळ असल्याने पक्षश्रेष्ठी याबाबतीत चांगलाच विचार करेल असेही यावेळी आ. चिखलीकर यांनी म्हणाले म्हणाले. सदर कार्यक्रमात बरबडा सर्कल मधील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि भागातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते.

दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांचे पक्षासाठी खूप मोठे योगदान — आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर*======================दिलीप धर्माधिकारी (मालक) बरबडेकर यांना पक्षाने तिकीट जाहीर करावे अशी बरबडा सर्कल जनतेची मागणी…नायगाव प्रतिनिधीअशोक वाघमारे.

RELATED ARTICLES

Most Popular