बीड जिल्हा प्रतिनिधी,

मातंग समाजाला गृहीत धरणाऱ्यांना निवडणूक महागात पडेल -अजिंक्य चांदणे
बीड /21 —
बीड नगरपरिषद अनुसूचित जाती महिला राखीव आहे अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने दोन नंबर वर असलेला मातंग समाज असतांना मातंग समाजाला फक्त गृहीत धरून नाकारले गेले ज्यांनी नाकारले त्यांना नाकारण्याची वेळ हीच आहे मातंग समाजाने आपले उपद्रव मूल्य वाढवणे गरजेचे आहे समाजाचे उपयोगिता मूल्य सहजासहजी उपलब्ध होते म्हणून समाजाची राजकीय वाताहत होत आहे..!
बीड नगर परिषदेची निवडणूक ही एक राजकीय उदाहरण असून या निवडणुकीचा धडा घेऊन आपण सावध राहणे गरजेचे आहे …!
असे मत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी बीड शहर सकल मातंग समाज बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले..! यावेळी मंचकावर शहरातील मातंग समाजाचे मान्यवर शिक्षक नेते उत्तमरावजी पवार, मा.सभापती प्रेमलता चांदणेमाजी नगरसेवक बिबीशन लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मोमीनलहुजी सेनेच्या शितल जाधव आझाद क्रांती सेनेचे नाना भिसे, मा. पोलीसनिरीक्षक भास्कर कांबळे, मा.पोलीस निरीक्षक सुनील वाघमारेमा.पोलीस निरीक्षक गणपत लोणकेबीएसपी जिल्हाध्यक्ष सतीश कापसे, ज्येष्ठ नेते अशोक सोनवणे, मानवी हक्क अभियान माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लोंढे डेमोक्रॅटिक पार्टीचे सुभाष लोणके ,सुनील पाटोळे











