HomeBlogदिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह : जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह : जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये भव्य आरोग्य शिबिर संपन्न… नांदेड प्र. अशोक वाघमारे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह : जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये भव्य आरोग्य शिबिर संपन्न

नांदेड प्रतिनिधी,

देगलूर, दि.27 जुलै 2026 : महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,देगलूरच्या वतीने दि.२२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’ विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहांतर्गत आज (दि.२७जुलै) देगलूर शहरातील नरंगल रोड येथे मजहर पटेल यांच्या निवासस्थानाजवळ भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शेकडो नागरिक व रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.जनसेवा सप्ताहाच्या प्रारंभी देगलूर उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिर,माजी व आजी खेळाडूंचा सन्मान,वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्याच मालिकेतील आजचे आरोग्य शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले वरील सर्व कार्यक्रम आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.असे शिवराज पाटील होटाळकर यांनी बोलताना म्हणाले
यावेळी उपस्थित
मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक लक्ष्मीकांत सावकार पद्दमवार,नगराध्यक्ष प्र.बालाजी टेकाळे,आरोग्य अधिकारी टेकाळे साहेब, तालुकाध्यक्ष शिवाजी मामा कंणकटे,शहराध्यक्ष देवेंद्र शेठ मोतेवार,मधुकर सावकार नारलावार,आसिफ पटेल, नंदकिशोर शाखावार,मनोज तोटावर,दिगंबर कडलवार, प्रा.उत्तमकुमार कांबळे, मिलिंद रामचंद्र बीरकंगन, शिवराज अप्पा ध्याडे, बालाजी मैलागिरे,सुमंत रामचंद्र कांबळे,संजय चिन्नामवार सावकार,सय्यद सर,मोहियोद्दीन,खालिद पटेल,अत्तर हाश्मी,सुमित कांबळे,ओमकार उल्लेवार,गजू कांबळे,शुभम चैनपुरे, रवी उल्लेवार,इद्रीस कुरेशी,संतोष उंगरातवार,राज गायकवाड आनंदराव शिंदे,प्रकाश पा बेलकर यांच्यासह विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि नगरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचारांबाबत सल्ला देण्यात आला.नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘जनसेवा सप्ताह’ हा समाजोपयोगी उपक्रम असून,समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मदत करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व देगलूर येथील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यावेळेस उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular