HomeBlogदेगाव फाट्यावर कुंटूंर पोलिसांची कारवाई; ९६ देशी दारूच्या बाटल्यांसह दोघे जेरबंद... नायगाव...

देगाव फाट्यावर कुंटूंर पोलिसांची कारवाई; ९६ देशी दारूच्या बाटल्यांसह दोघे जेरबंद… नायगाव प्र. गोविंद नरसीकर

देगाव फाट्यावर कुंटूंर पोलिसांची कारवाई; ९६ देशी दारूच्या बाटल्यांसह दोघे जेरबंद

अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बंदोबस्तादरम्यान अवैध दारू वाहतूक उघड; ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायगाव प्रतिनिधी– गोविंद नरसीकर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुंटूंर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या गस्तीदरम्यान पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईत देशी दारूच्या ९६ बाटल्या व मोटारसायकलसह एकूण ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असल्याची माहिती सपोनि विषाल भोसले यांनी दिली आहे.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सपोनि विशाल भोसले हे पोलीस हेडकॉन्स्टेबल कंधारे व पोलीस कर्मचारी हंबर्डे यांच्यासह कुंटूंर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना देगाव फाटा येथे संशयास्पदरीत्या येणारी एमएच २६ सीए ८९६४ क्रमांकाची काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली पल्सर मोटारसायकल अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोटारसायकलवरील खाकी रंगाच्या पोत्यामध्ये देशी भिंगरी संत्रा या ब्रँडच्या ९६ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ७ हजार ६८० रुपये, तर मोटारसायकलची किंमत ७० हजार रुपये असून एकूण ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रामेश्वर गुणवंतराव गुडपे वय ३० वर्ष व बालाजी गोविंदराव गुडपे वय २८ वर्ष हे दोघेही रा. देगाव, ता. नायगाव यांच्याविरुद्ध अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करून चोरट्या विक्रीचा उद्देश बाळगल्याप्रकरणी कुंटूंर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular