HomeBlogपोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शिवराज नरवाडे यांना निरोप..... नायगाव प्र. गोविंद...

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शिवराज नरवाडे यांना निरोप….. नायगाव प्र. गोविंद नरसीकर.

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शिवराज नरवाडे यांना निरोप

कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय अधिकाऱ्याला सहकाऱ्यांच्या वतीने व सपोनि विक्रम हराळे यांच्याकडून कार्याचा गौरव

नायगाव प्रतिनिधी – गोविंद नरसीकर

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवराज नरवाडे यांची परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलीस ठाण्यात बदली झाल्याने सोमवार, दि. ७ जुलै रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्या सन्मानार्थ निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नरवाडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बदली झालेले पोलीस निरीक्षक शिवराज नरवाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सपोनि विक्रम हराळे यांनी शिवराज नरवाडे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. गेल्या तीन वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हे नियंत्रण, नागरिकांशी सुसंवाद आणि पोलीस दलात शिस्त व कार्यक्षमतेची जपणूक करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण कामे यशस्वीरीत्या पार पडली असून, त्यांच्या कार्याची आठवण रामतीर्थ पोलीस ठाण्याला कायम राहील, असे गौरवोद्गार हराळे यांनी काढले.
याप्रसंगी शिवराज नरवाडे यांनीही सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पाथरी येथेही याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास रामतीर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार गोविंद नरसीकर व गंगाधर गंगासागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार समारंभात उपस्थितांनी नरवाडे यांना पुढील सेवाप्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची कामना केली.

RELATED ARTICLES

Most Popular