HomeBlogआरक्षण उपवर्गीकरण विधेयक मंजुर करा,डॉ.रामचंद्र भरांडे... नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरण विधेयक मंजुर करा,डॉ.रामचंद्र भरांडे… नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

आरक्षण उपवर्गीकरण विधेयक मंजुर करा,डॉ.रामचंद्र भरांडे

सरकार सकारात्मक भुमिकेत लवकरच निर्णय होईल -गिरीश महाजन यांचे सुतोवाच.
………………………………….
नांदेड प्रतिनिधी,

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणा बाबत राज्य सरकार सकारात्मक असुन,अतिवृष्टीची परीस्थिती निवळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व एकुण ५८ समाजाच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती दिली जाईल.अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन व संसदीय कार्यमंत्री नामदार
गिरीश महाजन महामोर्चाला संबोधित करताना सांगितले आहे. अनुसुचित जातीचे अ आणि ब गटात आरक्षण उपवर्गीकरणासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. रामचंद्र भरांडे यांनी
धर्माबाद ते मुंबई अशी ऐन पावसात काढण्यात आलेल्या महापदयात्रे नंतर आंदोलन कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. “एवढ्या पावसात तुम्ही केलेला प्रवास तुमची तळमळ आणि संघर्षाची तीव्रता दर्शवतो.सर्वांनी सुखरुप घरी जावे.असे ही आवाहन केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, अनुसुचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी आपली भूमिका मांडताना प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे म्हणाले की,उपवर्गीकरणासाठी पस्तीस वर्षांपासुन अविरतपणे लढा सुरु असून, या मागणीसाठी चार तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. १९ मार्चच्या मोर्चानंतर ही फक्त आश्वासने देण्यात आले होते. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने उपवर्गीकरण जाहीर करावे.अन्यथा राज्यभर मंत्र्यांना वस्त्यांमध्ये फिरु देणार नाही.असा सज्जड इशारा भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ मंत्री नामदार गिरीश महाजन यांना महामोर्चाला भेट दिल्यानंतर देण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी उपवर्गीकरण करताना अनुसूचित जातींचे प्रगत आणि अप्रगत असे दोन अ आणि ब असे दोन गट करावेत.अशी ही मागणी डॉ.भरांडे यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,अ प्रगत गटात सुधारित जाती समुहाचा समावेश तर म्हणजे ब गटात मातंग व तत्सम जातींचा समावेश करुन, त्या गटाला ६ टक्के आरक्षण द्यावे.तर ईतर जातींचा प्रगत म्हणजे अ गटाला सामाजिक अभ्यास करुन समावेश करावा.
या आंदोलनाला वाल्मिकी व मादीगा मेहतर,भंगी समाजा सह विविध जात समुदाय घटकांनी पाठिंबा दर्शविला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन हजारोच्या संख्येने लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते या महापदयात्रेत सहभागी झाले होते. दिं.०६ जुलै रोजी महापदयात्रा समारोप व मंत्रालयावर महामोर्चा आयोजित केला होता.लोकस्वराज्य आंदोलनाचे व्हि.जी.डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष, रावसाहेब पवार,अँड दत्तराज गायकवाड, गणपतराव रेड्डी, कपिल पिंगळे,प्रकाश टिकेकर, बी.एम. गोणारकर,के.वाय. देवकांबळे, प्रबोधनकार माधवराव वाघमारे,निदानकर आदी जण यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular