HomeBlogभाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडेंकडून जाधव-पाटील कुटुंबीयांचे सांत्वन... नायगाव, गोविंद नरसीकर

भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडेंकडून जाधव-पाटील कुटुंबीयांचे सांत्वन… नायगाव, गोविंद नरसीकर

भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडेंकडून जाधव-पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

विठ्ठलराव पाटलांच्या आठवणींना उजाळा; दुःखात कुटुंबीयांना दिला धीर

नायगाव प्रतिनिधी — गोविंद नरसीकर

नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील ज्येष्ठ नागरिक तथा समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलराव पाटील जाधव कांडाळकर यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर दि.९ ऑगस्ट रोजी रविवारी भाजपा नेते तथा पंचायत समिती नायगावचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी कांडाळा येथील निवासस्थानी भेट देत जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी भिलवंडे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. विठ्ठलराव पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साधेपणा, आपुलकी आणि सामाजिक जिव्हाळ्याच्या आठवणींना त्यांनी भावपूर्ण स्मरण केले. त्यांच्या निधनाने कुटुंबासह परिसराचीही मोठी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी नरसीचे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, सय्यद इस्माईलसाब, पत्रकार गोविंद नरसीकर, विक्रम पाटील जाधव, धम्मदीप भद्रे, जाधव परीवारातील परसराम पाटील जाधव कांडाळकर, दिलीप पाटील कांडाळकर, उपसरपंच रमेश पाटील, राजू पाटील कांडाळकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular