HomeBlogम.फुले बुद्धानंतर प्रस्थापिता विरोधात कार्य केल्याने पहिले महापुरूष ठरले : सुदर्शन इंगळे

म.फुले बुद्धानंतर प्रस्थापिता विरोधात कार्य केल्याने पहिले महापुरूष ठरले : सुदर्शन इंगळे

म.फुले बुद्धानंतर प्रस्थापिता विरोधात कार्य केल्याने पहिले महापुरूष ठरले : सुदर्शन इंगळे

जिल्हा प्रतिनिधी सातारा :

बुद्धाच्या नंतर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ज्या ताकतीने महात्मा फुले दंड थोपटून उभे राहिले ते आधुनिक भारतामध्ये पहिले महापुरुष आहे.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सुदर्शन इंगळे यांनी केले.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ म.ज्योतिबा फुले यांनी १९९ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा इंगळे मार्गदर्शन करीत होते.

अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि.रमेश इंजे होते.यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते,उपनगराध्यक्ष ऍड.दत्ता बनकर,सभापती, नगरसेवक व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुदर्शन इंगळे म्हणाले, “महात्मा फुले हे एक उत्तम उद्योजक होते.ते एक उच्च कोटीचे शिक्षण तज्ञ होते.

हंटर कमिशनला दिलेले निवेदन हे जगप्रसिद्ध आहे.शेती आणि शेतकरी यांच्या हितांचं अतिशय शास्त्रीय मांडणी त्यांनी, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकाद्वारे केलेली आहे.” प्रथमतः मान्यवरांनी म.फुले यांच्या प्रतिमेस व डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामुदायिक वंदना घेण्यात आली.सरतेशेवटी शाहीर किरण जगताप व श्रीरंग रणदिवे यांनी सुमधुर आवाजात म.फुले यांच्या जीवनचरित्रावर गायन केले. बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.तथागत फाऊंडेशनतर्फे प्रशांत झालटे यांनी लाडू व पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. सदरच्या कार्यक्रमास थेरो दिंपकर (भन्ते), युवा शाहीर सत्यवान गायकवाड, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे व बी.एल.माने,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,सचिव गणेश कारंडे, जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, महासचिव यशपाल बनसोडे, नंदकुमार काळे (भारतीय बौद्ध महासभा जिल्हा हिशोब तपासणीस),वामनराव गायकवाड (जिल्हा संस्कार सचिव), योगेश मस्के (तालुका कोषाध्यक्ष),राजेंद्र शिंदे (तालुका पर्यटन अध्यक्ष), दिलीप सावंत (संघटक),दिलीप गायकवाड (तालुका संघटक), मनोज वाघमारे (कार्यालयीन सचिव),प्रा.रमेश मस्के,ऍड. प्रियांका गडदे, मारुती भोसले, अशोक भोसले,अंकुश धाइंजे, दिलीप फणसे,अरुण साळुंखे, कृष्णा गव्हाळे,प्रभाकर बनसोडे, अशोक कांबळे,माजी गटशिक्षणाधिकारी डी. एस. भोसले माजी प्राचार्य रमेश जाधव,ऍड.विलास वहागावकर, समाधान कांबळे, राजू घोलप विविध माध्यमांचे पत्रकार आदी उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो : संसदेच्या प्रतिकृतीत महापुरुषांना अभिवादन करताना मान्यवर.

RELATED ARTICLES

Most Popular