
महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी , अशोक वाघमारे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर टांगती तलवार…मुंबई. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण मागील महिन्यापूर्वी जाहीर झाले असून यात 50% ची मर्यादा ओलांडत ही आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला थेट इशारा देऊन आरक्षणाच्या मर्यादित राहून निवडणुका घ्या अन्यथा निवडणुका रद्द करू असा थेट इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.स्था. स्व. संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये 50% ची मर्यादा ओलांडत राज्यातील नगरपंचायत नगरपरिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकेमध्ये आरक्षण सोडत करण्यात आली होती यात 50% ची मर्यादा ओलांड्याचे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात आल्याने हे आरक्षण मर्यादा तात्काळ थांबवण्यात यावी व आरक्षण 50% च्या आत ठेवून घेण्यात याव्या अशा प्रकारचे थेट निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला देत सुनावले आहे.
अन्यथा निवडणूकच रद्द करण्यात येईल अशा प्रकारच्या सणसणीत निर्णय राज्य सरकारला देण्यात आले आहेत. म्हणून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि महानगरपालिकेवर टांगती तलवार असण्याची शक्यता आहे







