

तालुका प्रतिनिधी, सुदर्शन वाघमारे.
_*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ – तहसील कार्यालय, बिलोली.*_।। महसूल सेवा आपल्या दारी, लोकाभिमुख प्रशासनाची भरारी ।।लोहगांव परिसरातील सर्व सन्माननीय ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकीय सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तहसील कार्यालय, बिलोली व मंडळ अधिकारी कार्यालय, लोहगांव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 शिबिराचे ठिकाण व वेळ*दिनांक:- 17/04/2026 * वेळ :- सकाळी:- 10 वाजता * स्थळ: जि. प. शाळा लोहगांव * आयोजक :- मंडळ अधिकारी कार्यालय, लोहगांव व सर्व ग्राम महसूल अधिकारी लोहगाव*अभियानाचा मुख्य उद्देश:-* 🎯
* लोकाभिमुख प्रशासन: महसूल सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचवणे. * तक्रार निवारण:
दैनंदिन महसूल विषयक तक्रारींचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण. * डिजिटल सेवा:
डिजिटल ७/१२, ८अ आणि 'Single Day Service Delivery' चा प्रभावी वापर. * प्रलंबित प्रकरणे: १००% प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.
🛠_*शिबिर स्थळी मिळणाऱ्या १५ प्रमुख सेवा:-*_१. ७/१२ वाचन: 'जिवंत ७/१२ मोहीम' अंतर्गत प्रत्यक्ष वाचन.
२. सामाजिक योजना: विविध अर्थसहाय्य योजनांचे अर्ज स्वीकारणे.
३. त्रुटी दुरुस्ती: ७/१२ मधील तांत्रिक त्रुटींबाबत अर्ज स्वीकारणे.
४. विद्यार्थी सुविधा: शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक सर्व दाखल्यांचे अर्ज.
५. डिजिटल जनजागृती: डिजिटल ७/१२ च्या कायदेशीर वैधतेबाबत मार्गदर्शन.
६. 7/12 उतारा वाटप :- मंजूर फेरफार, ७/१२ व 8अ खाते उतारा वाटप.
७. जमीन रुपांतरण: भोगवटदार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करणे.
८. तुकडेबंदी नियमितीकरण: दि. १५/११/१९६५ ते १५/११/२०२४ पर्यंतचे कमी क्षेत्राचे खरेदी-विक्री व्यवहार नियमानुकूल करणे.
९. अकृषक (NA) मार्गदर्शन: अकृषक तरतुदींमधील सुधारणांबाबत सल्ला.
१०. ऑनलाईन सेवा: आवश्यक कागदपत्रांसह विविध ऑनलाईन अर्जांची स्वीकृती.
11. अग्रीस्टेक व पी.एम.किसान नोंदणी.
📢 *आवाहन:-*बिलोली तालुक्यातील व लोहगाव मंडळातील सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच कृषी विभाग,ग्रामविकास विभाग,आरोग्य विभाग,तालुका भूमी अभिलेख कार्यालय व वन विभाग व आपल्या महसूल विषयक समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे."पारदर्शक प्रशासन, गतिमान प्रशासन!"विनीत:तहसील कार्यालय, बिलोलीव मंडळ अधिकारी कार्यालय, लोहगाव
मंडळ अधिकारी साहेब यांनी त्यांच्या मंडळामध्ये खूप छान हा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे खूप गोरगरीब जनता त्यांचा जय जयकार करत आहे असे साहेब लोहगाव मंडळला मिळणे हे लोहगावचे भाग्य आहे असे जनतेतून चर्चा चालू आहे

प्रमुख उपस्थिती मा. उपजिल्हाधिकारी मॅडम क्रांती डोंबे ,तहसीलदार गजानन शिंदे साहेब ,रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पीएसआय नरवाडे साहेब, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत आंबेराय साहेब ,तलाठी भालेराव साहेब ,राठोड साहेब ,अनुलोम भाग सेवक अंगावर ज्ञानेश्वर ,राहुल जिगळेकर ,सरपंच नम्रता कोरणुले,शिवाजी मेंडके, मालू वानोळे सर उपस्थित होते व समस्थ गावकरी मंडळी



शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे
शिव महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्कल प्रमुख जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क.9689802102







