HomeBlogइज्जतगावच्या अवैध वाळू उपशावर मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी व कुंटूर पो. स्टे....

इज्जतगावच्या अवैध वाळू उपशावर मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी व कुंटूर पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त कारवाईत एक कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…..

नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे.

इज्जतगावच्या अवैध वाळू उपशावर मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी व कुंटूर पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त कारवाईत एक कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…..

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील गोदावरी पात्रातून आयुर्वेदिक मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर व कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी धाडसी कारवाई दि १७ एप्रिल रोजी च्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक छापा मारून कारवाईत एक कोटी ७ लाख ७५ हजार सह आठ ब्रास रेती जप्त करून नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व उपसा करणारे साहित्य जाग्यावरच जिलेटिन च्या साह्याने मोठी फायबर व लहान फायबर बोट नष्ट केल्याने वाळू माफियात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील जत गाव शिवारातील उपसरपंच मारुती डोईफोडे यांच्या शेतीलगत असलेल्या वीट भट्टी जवळून दोन बोटीच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळूची बेसुमार उपसा होत होती याबाबतची गुप्तपणे खात्रीलायक माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत १७ एप्रिल रोजी मध्ये रात्री दोन वाजता कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले व सर्व सहकारी सोबत घेत डी.वाय. एस. पी. पानेगावकर यांनी अचानक धाड टाकली आहे. यात तीन हवा ज्यांचा क्रमांक एमएच २६ बी ९९२९,एमएच २६सीएच २०६५, एमएच ४३- १९५७ असून तीन हवा सह एक कोटी सत्तर लाख ७५ हजार व आठ ब्रास वाळू सह कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक मोठी फायबर बोट जिलेटिनच्या नळकांड्यांच्या साह्याने जागीच नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी साहेब पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे यांनी दिलेल्या यादीवरून आरोपी अहवाल व मालक सोनाजी हेंडगे ( रा. कहळा खु ), चालक भानुदास हांडेवार मालक विठ्ठल शिंदे, चालक कैलास शिंदे (रा. मनूर ), मालक साईनाथ पांडे( रा रुई बु ), चिलमनवाड (रा डोणगाव ता मुदखेड ), मालक मारुती गोविंदराव डोईफोडे (रा. इज्जतगाव ), मोठी बोट व इंजन मालक ज्ञानेश्वर पांडुर्णे (रा. मारताळा ), या नऊ आरोपीसह इतर तीगाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. ठाकूर हे करीत आहेत.चौकट :- महसूल प्रशासनाचा गुप्त आशीर्वाद – जनतेचे मत महसूल मंडळात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपशावर पोलीस प्रशासनाची कारवाई मात्र महसूल प्रशासन कारवाई करण्याऐवजी गुप्त आशीर्वाद देत असल्याची जनतेमध्ये चर्चा व्यक्त होत आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने धाडसी कारवाई करत यात मुद्देमाल जप्त सह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात पोलीस प्रशासन सक्षम पोलीस प्रशासनाच्या धाडसी कारवाईने भगत कौतुकाची होत आहे.

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

शिव महाराष्ट्र न्यूज मध्ये जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी सर्कल प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा 8010874742

RELATED ARTICLES

Most Popular