HomeBlogव्यंकटराव खतगावकर यांची शिवसेना प्रभारी उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

व्यंकटराव खतगावकर यांची शिवसेना प्रभारी उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

बिलोली/देगलूर प्रतिनिधी

नांदेड: बिलोली तालुक्यातील खतगाव येथील रहिवासी व शिवसेनेचे युवा कार्यकर्ते व्यंकटराव खतगावकर यांची शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाच्या प्रभारी उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका जाहीर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगर परिषदेचे निवडणूक लागले असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने शिवसेना ( शिंदे गट) पक्षाने ग्रामीण भागात पक्ष बळकटीसाठी व्यंकटराव मंडगे खतगावकर यांच्यावर देगलूर बिलोली विधानसभेची जबाबदारी टाकत त्यांची शिवसेना प्रभारी उपजिल्हा प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांची शिवसेना प्रभारी उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, बिलोली ता. प्रमुख बाबाराव पा. रोकड, शहरप्रमुख श्रीकांत गादगे, देगलूर ता. प्रमुख गंगाधर तमलुरकर, शहर प्रमुख व्यंकटराव पुरमवाड, देगलूर बिलोली विधानसभा संघटक अरविंद पेंटे, कुंडलवाडी शहरप्रमुख लक्ष्मण गंगोणे, बिलोली ता. उपप्रमुख वसंत जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक पाटील आदमपूरकर आदीने अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular