HomeBlogउल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीचा सत्कार होणे गरजेचे : डॉ.रमाकांत साठे

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीचा सत्कार होणे गरजेचे : डॉ.रमाकांत साठे

पत्रकारांनी संघटनेस बळ दिले : उमेश चव्हाण

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीचा सत्कार होणे गरजेचे : डॉ.रमाकांत साठेपत्रकारांनी संघटनेस बळ दिले : उमेश चव्हाण

सातारा : जिल्हा प्रतिनिधी

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजाने सत्कार करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन डॉ.रमाकांत साठे यांनी केले.       दलित महासंघ,अण्णाभाऊ साठे कृती समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल पर्ल येथे भव्य प्रबोधन मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे  संस्थापक उमेश चव्हाण होते.    उमेश चव्हाण म्हणाले, "लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार समाजप्रबोधन करीत असतात.आमच्या संघटनेचे कार्य राज्यभर प्रचार-प्रसार करण्याचे काम पत्रकार बंधूंनी केलेले आहे.खरोखच,त्यांनी आमच्या संघटनेस बळ दिलेले आहे.त्यामुळे त्यांचा गौरव करणे आमचे कामच आहे.लढणाऱ्या संघटनेबरोबर राहिले तर समाजाचा सर्वांगीण विकास होतो.जातीविरहित आम्ही संघटना लोकांच्या न्याय हक्कासाठी चालवत असतो. पारधी व इतर समाजबांधवांनी आपल्या पाल्यांना शिक्षण दिले पाहिजे.शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे.ते प्राशन केले तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत.शिक्षण घेऊन संघटीत झाले तर आपसुकच अन्यायाविरुद्ध लढ्यास बळ मिळू शकेल.आमची संघटना लोकांच्या जीवावर चालवतो. निवडणुकीत चुकीचा मार्ग स्वीकारू नका.सरकारी योजनांची कार्यवाही होण्यासाठीही समाजबांधवांनी सतर्क राहिले पाहिजे.खरोखच हा मेळावा विचार करणारा आहे." यावेळी डॉ.राहुल जाधव, अजित जगताप,किशोर गाल्फाडे, किशोर धुमाळ आदींनी मनोगत व्यक्त केली.     सदरच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सामाजिक,वैद्यकीय, पत्रकार आदींचा फेटा, संविधान प्रस्ताविका व ट्रॉफी देवुन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्यात त्यांच्या विचारांचा जागर प्रसार करून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.उपेक्षित व वंचित घटकांसाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लढा, त्याग आणि संघर्ष यांचा गौरव करण्यात आला, त्यांच्या विचारांवर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शनही झाले.सदरच्या सन्मान सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अनुराधा सकट, डॉ. सुभाष कदम, डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. उल्का झेंडे, डॉ. सुधीर कदम, डॉ. सुजय सकट, अजित जगताप,गुरुनाथ जाधव, विनोद नेवसे, प्रकाश वायदंडे, विशाल गुजर, विश्वास शेडगे, सुर्यप्रताप कांबळे, डॉ.श्रीनिवास पाटील, राजाराम पवार,किशोर गाल्फाडे,संजय कारंडे,अनिल वीर आदींचा समावेश होता.  सदरच्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक निलेश तांबे,अमोल पाटोळे, रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे,किशोर धुमाळ,ऍड. विलास वहागावकर,इतर मान्यवर,संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.सरतेशेवटी स्नेहभोजनांनी सांगता करण्यात आली.फोटो : अनिल वीर यांचा सत्कार करताना डॉ.रमांकात साठे शेजारी मान्यवर.

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

शिव महाराष्ट्र न्यूज मध्ये जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी सर्कल प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा 8010874742
RELATED ARTICLES

Most Popular