HomeBlogहुस्सा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी….

हुस्सा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी….

नायगाव शहर प्रतिनिधी अविनाश वाघमारे

हुस्सा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी….

नायगाव प्रतिनिधी अविनाश वाघमारे..

तालुक्यातील मौजे हुस्सा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पूज्य बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बुद्ध विहार येथे शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांच्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण हुस्सा नगरीचे पोलीस पाटील यशवंत पाटील हंबर्डे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात उपस्थित चिमुकल्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित सखोल अशी मार्गदर्शन केले त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सौ विनाबाई श्यामसुंदर हंबर्डे यांनी देखील मार्गदर्शन केले आहे.व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता काढण्यात आली मिरवणुकीत बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत गणपत हंबर्डे, प्रमुख पाहुणे व्यंकटराव किशन हंबर्डे, व्‍यंकटी आनंदा हंबर्डे, नंदकिशोर शिवाजी हंबर्डे , बालाजी दिगंबर हंबर्डे, दादाराव हंबर्डे, भाऊराव तेलंगे, दत्ता तेलंगे, लक्ष्मण तेलंगे, यासह भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष केरबा हनुमंता गायकवाड, उपाध्यक्ष दिगंबर धनकवाड, पांडुरंग गायकवाड, भगवान गायकवाड, आनंदा संभाजी गायकवाड, बाबू आनंदा गायकवाड , रामजी गायकवाड, नामदेव भगतकर, नामदेव आनंदा भगतकर, गौतम गायकवाड, दिलीप गायकवाड, डॉ.उमेश गायकवाड, संदीप गायकवाड प्रकाश गायकवाड मारुती गायकवाड उत्तम गायकवाड यासह समाजातील व तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक पत्रकार अशोक वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत चे माजी सदस्य प्रतिनिधी बाबू गायकवाड यांनी केले आहे.यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला सह नागरिक उपस्थित होते.

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे

RELATED ARTICLES

Most Popular