HomeBlogनांदेडमध्ये विष्णुपुरी ग्रामीणच्या बीएमआयटी रजिस्ट्रेशन प्रकरणाची चौकशी करण्याची **एनएसयुआयची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ......

नांदेडमध्ये विष्णुपुरी ग्रामीणच्या बीएमआयटी रजिस्ट्रेशन प्रकरणाची चौकशी करण्याची **एनएसयुआयची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी … जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष (NSUI) सूरज पाटील शिंदे ,

संपादक, सुदर्शन वाघमारे महाराष्ट्र राज्य

  • नांदेड:(शिव महाराष्ट्र न्यूज)
  • विष्णुपुरी येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस मधील बीएमआयटी या अभ्यासक्रमाला रजिस्ट्रेशन नंबर नसल्याने शिक्षण पूर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नोकरी भरतीसाठी अर्ज करता येत नाहीत व पदवी प्रमाणपत्रही मिळाले नाहीत. यामुळे अनेक वर्षापासून उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
  • दरम्यान विद्यार्थी काँग्रेस एनएसयुआय चे जिल्हाध्यक्ष सुरज शिंदे यांनी ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना घेऊन गुरुवार 20 रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे ग्रामीणच्या चौकशीची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
  • विष्णुपुरी येथील ग्रामीण पॉलीटेक्निकल कॉलेज येथे बीएमएलटी आणि बीएमआयटी हे अभ्यासक्रम सुरू आहेत, मात्र या अभ्यासक्रमास रजिस्ट्रेशन नसल्याने अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊनही नोकरी भरतीसाठी अर्ज करण्याकरता विद्यार्थी अपात्र होत आहेत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नाहीत.
  • तरी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळत सरसपणे ग्रामीण कॉलेज येथे बीएमएलटी आणि बीएमआयटी हे अभ्यासक्रम सुरू आहेत या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि गैरप्रकरणी ग्रामीण कॉलेज विरोधात कार्यवाही करून कॉलेजची मान्यता रद्द करावी अशी मागणी विद्यार्थी काँग्रेस एन एस यु आय जिल्हाध्यक्ष सुरज पाटील शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे यावेळी ग्रामीण कॉलेजचे बीएमएलटी, बीएमआयटी अभ्यासक्रमाचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular